Share

रिक्षाचालकाने घराचं, मुलाचं अन् टेम्पोचं नाव ठेवलं संविधान, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

पुण्यात राहणाऱ्या राजकुमार म्हस्के  यांनी आपल्या मुलाचं, घराचं आणि दुकानाचं नाव संविधान ठेवलं आहे. पुण्यातल्या जनता वसाहतीत राहणारे राजकुमार म्हस्के हे सध्या चर्चेत आहेत. त्यांचे संविधानावर असलेले प्रेम पाहून सगळेच भारावून गेले आहेत.

ते सांगतात की, आज मी जो काही आहे तो संविधानामुळे आहे. संविधानाचं महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी त्यांनी आपल्या मुलाचं नाव, दुकानाचं नाव आणि रिक्षा, टेम्पोचं नाव सुद्धा संविधान ठेवलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते जनता वसाहतीत राहत आहेत.

जनता वसाहत हा दाटीवाटीचा आणि झोपडपट्टीचा एक भाग आहे. पर्वतीच्या पायथ्याला ही वसाहत आहे. या भागात त्यांचं संविधान नावाचं छोटं घर आहे. त्यांनी सगळ्यांनाच संविधान दिलं असल्याने सगळे लोक त्यांना ओळखतात. कोणालाही पत्ता विचारला तरी त्यांच्या घराचा पत्ता सगळ्यांना माहिती आहे.

राजकुमार मुळचे सोलापूरचे आहेत.  त्यांचे आईवडील गरीब होते. ते वीटभट्टीवर काम करायचे त्यामुळे त्यांना शिकता आले नाही. आपल्याला शिकता आलं नाही पण आपल्या मुलांना शिकता आले पाहिजे या विचाराने ते मुलांना शिक्षण देत आहेत. त्यांची मुलं पुण्यातल्या नावाजलेल्या शाळेत शिक्षण घेत आहेत.

राजकुमार म्हणाले की, संविधानाच्या प्रचारासाठी त्यांनी मुलाचं नाव संविधान ठेवलं. तर नागपूरच्या दीक्षाभूमीवरून प्रेरणा घेत एका मुलीचं नाव दीक्षा तर दुसरीचं नाव भूमी असं ठेवलं. आज मी जो काही आहे तो बाबासाहेबांमुळेच आहे. आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबासाहेबांनी दिला आहे असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आई वडिलांनी जरी आम्हाला घडवलं असलं तरी या जिंदगीला आंबेडकरांनी सोन्याने मढवलं आहे. आंबेडकरांचे विचार पोहचवण्यासाठी घराला, दुकानाला, टेम्पो, रिक्षा, टू व्हीलर या सगळ्याला संविधान असं नाव मी दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला.

महत्वाच्या बातम्या
“तो माझा जावई नाही…”, मुलगी अथियाचं लग्न होताच वडील सुनील शेट्टीचं केएल राहुलबद्दल धक्कादायक विधान
सूर्याने मोडला पाकिस्तानचा माज; बाबर-रिझवानला डावलून ICC ने सुर्याला दिले ‘हे’ खास बक्षीस
पठाणचा करेक्ट कार्यक्रम! बजरंग दलाचे कार्यकर्ते काठ्या घेऊन सिनेमागृहात, ‘या’ ठिकाणी शो रद्द
ब्रेकींग! शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांची होणार हकालपट्टी; कोण आहेत ते मंत्री?

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now