मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीसांच्या सरकारला आता सात महिने पुर्ण झाले आहे. या सत्तेवर गृहमंत्री अमित शाह यांचे बारीक लक्ष असून ते सुद्धा राज्यातील मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेत आहे. पण आता ते तीन मंत्र्यांच्या कामावरुन नाराज असल्याची चर्चा आहे.
अमित शाह यांनी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला आहे. त्यावेळी त्यांनी मंत्र्यांची कामे बघितली असून ते काही मंत्र्यांच्या कामांवर खुश नसल्याचे समोर आले आहे. तीन मंत्र्यांच्या कामावर ते नाराज असल्यामुळे त्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता असते.
गृहमंत्रालयाची सूत्रं, मतदारसंघातून आणि पक्षातील यंत्रणांनी अमित शाहांना माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे अमित शाह मोठा निर्णय घेऊ शकतात. तीन मंत्र्यांबद्दलच्या काही तक्रारी अमित शाहांपर्यंत पोहचल्या आहे.
अमित शाहांनी त्याबद्दल काही प्रश्नही विचारले होते. त्यावर मंत्र्यांनी त्यांना दिलेल्या उत्तरावर अमित शाह काय निर्णय घेणार यावर मंत्र्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. पण हे तीन मंत्री कोण असणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच साखर उद्योगाच्या विकासासाठीही चर्चा झाली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी साखर उद्योगांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. याचा साखर उद्योगाला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. महाराष्ट्रातून होणाऱ्या निर्यातीवरही चर्चा झाली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीला झटका, शरद पवारांचा निकटवर्तीय आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? चर्चांना उधाण
ऊस तोड मजूर नवरा-बायकोने इन्स्टावर शेअर केलं रील, रातोरात झाले स्टार, कमेंट्स लाईक्सचा पाऊस
वराने वधूच्या वडिलांना हुंड्याचे अडीच लाख रुपये सन्मानपूर्वक केले परत, घेतला फक्त १ रुपया