पत्नीच्या काळजीपोटी बुरखा घालून डिलीव्हरी वॉर्डात पोहोचला पण.., वाचा नेमकं काय घडलं

पत्नी गरोदर होती. तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान, पतीला असं काळालं की, पत्नीची तब्येत नाजूक आहे. पण पतीला पत्नीला भेटता येत नव्हते कारण तेथे पुरुषांना जाण्यास मनाई होती.

मग तरूण थेट बुरखा घालून पत्नीला भेटण्यासाठी डिलीव्हरी वॉर्डात पोहोचला. पण ही बाब तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी थेट त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही घटना शनिवारी रात्री घडली. रात्री साडेअकराच्या सुमारास मौला नावाचा तरूण शासकीय रुग्णालयात घुसला.

बी ब्लॉकमध्ये त्याची पत्नी होती. तेथे आत जाण्यापुर्वी त्याने बुरखा घातला. जात असताना सुरक्षा रक्षकाने त्याला अडवले. त्याने पाण्याची बाटली देण्याचा इशारा केला. यादरम्यान, जवळपास १५ मिनीटं तो तिथंच थांबला होता. तेथे असलेल्या डॉक्टरांनी आवाज दिला की, संबंधित पेशंटचे नातेवाईक कोण आहेत? तेवढ्यात बुरखा घातलेल्या तरुणाने आवाज दिला.

यावेळी बुरखा घातलेल्या मौलाचा आवाज त्यांना पुरूषासारखा जाणवला. तेथील कर्मचाऱ्यांना शंका आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच्याशी संवाद साधला. पुन्हा संवाद साधल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बुरखा काढला. बुरखा काढताच तो फाटला अन् कर्मचाऱ्यांना महिला वॉर्डात पुरूष आल्याची माहिती मिळाली.

यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून सिव्हील पोलिस चौकीत पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेची नोंद सिव्हील हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकांनी घेतली. हॉस्पिटलमध्ये बुरख्याला परवानगी नव्हती पण काही महिलांनी याला विरोध केला होता त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पुन्हा बुरख्याला परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान, तरुण तीन दिवसांपासून पत्नीला भेटला नव्हता. बायकोला भेटण्यासाठी त्याचे मन विचलित होत होते. बायकोच्या चिंतेपोटी तो बुरखा घालून महिला बॉर्डात पोहोचला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्याच्या नवजात मुलीचे ह्रद्याचे ठोके कमी झाल्याने तिचाही मृत्यु झाला आहे.

सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मौला याने आपल्या नातेवाईकांसमोरच लिफ्टमध्ये बुरखा घातला. कोणालाही शंका येऊ नये म्हणून त्याने आपली चालही मुलींसारखीच ठेवली होती. शिवाय पुर्ण डोक्यापासून खालपर्यंत बुरखा घातला होता.

महत्वाच्या बातम्या
‘या’ मुंबईकर खेळाडूने केला कहर; 81 चौकार, 18 षटकारांच्या मदतीने केल्या 508 धावा
अभिनेते अशोक सराफ आहेत ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त; पत्नी निवेदितांनी सांगीतलेल्या माहितीने सिनेसृष्टी हादरली
अशोक सराफ देताहेत ‘या’ गंभीर आजाराशी झुंज; पत्नी निवेदीता म्हणाल्या ‘त्यांना बोलताही येत नाही…
उर्फी जावेदला सार्वजनिक ठिकाणी अतरंगी कपडे घालून फिरण पडणार महागात, मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस