सध्या रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया (Genelia) यांचा मराठी चित्रपट वेड हा चांगलाच चर्चेत आहे. ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. रितेश जेनेलिया कित्येक वर्षानंतरसोबत काम करताना दिसून येत आहे. तसेच या चित्रपटात जेष्ठ अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) यांनी देखील काम केले आहे.
सध्या वेड (Ved) चित्रपटाने सगळ्यांना वेडच लावले आहे.मराठीतील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदाचे महावीर म्हणजे अशोक सराफ. सध्या अशोक सराफ एका आजारानं त्रस्त आहेत. अशोक सराफ यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या आजाराविषयी माहिती दिली आहे.
अशोक सराफ यांना लॅरेंजायटिस आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे त्यांना बोलता देखिल येत नाही, अशी माहिती निवेदिता यांनी दिली आहे. जेष्ठ अभिनेते महेश कोठारे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन दोन दिवसांपूर्वी पार पडले. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
मात्र, या कार्यक्रमात कोठारे यांचे जवळचे मित्र अशोक सराफ उपस्थित नव्हते. ‘डॅम इट आणि बरंच काही..’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवेदिता सराफ एकट्याच दिसल्या. त्यामुळे अशोक सराफ यांच्याविषयी चर्चा रंगली. नेहमीच प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानाच प्रसिद्धी मिळते हि आजची खरी शोकांतिका आहे.
अशोक सराफ यांच्या घशावर सूज आल्यामुळे त्यांना बोलता येत नाही. लॅरेंजायटिस आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना सक्तीची विश्रांती घेण गरजेचे असते. ह्या कारणामुळेच अशोक सराफ सध्या मीडियासमोर किंवा नाटकात पाहायला मिळाले नाहीत. वेड चित्रपटात अशोक सराफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
दरम्यान, दरवेळी अशोक सराफ यांच्या कामाच कौतुक सगळीकडे ऐकायला मिळाते. पण यावेळी मात्र सराफ यांची प्रसिद्ध थोडी कमीच पहायला मिळत आहे. अशोक सराफ यांनी आपल्या वयाची ७५री ओलांडली आहे. यादरम्यान आजाराबाबत माहिती मिळताच अशोक सराफ यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर काही चाहते ते लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या बृजभुषणसिंगांनी महाराष्ट्रात येताच केली मोठी चूक; शिवाजी महाराजांबाबत बोलताना म्हणाले…
- वेड चित्रपटाला मिळालेलं यश पाहून रितेशची वहिनीही भारावली; म्हणाली, तुम्ही दोघं..
- ४ गुणांचा वाद, सिकंदरवर अन्याय झाला असं म्हंटलं जातंय, पण नेमकं काय घडलं? जाणून घ्या