Share

ड्रायव्हरचा मुलगा एकाच चित्रपटाने झाला साऊथ सुपरस्टार, कमी वयातच कमावली प्रचंड संपत्ती

KGF कन्नड चित्रपटाचा नायक यश आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी झाला. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. त्याचे वडील अरुण कुमार कर्नाटक परिवहन सेवेत चालक आहेत आणि आई पुष्पा गृहिणी आहे. यशने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात मोग्गीना मनसू (2008) मधून केली होती.

यशने राजधानी, मिस्टर अँड मिसेस रामाचारी आणि किरतका सारखे चित्रपट केले असले तरी, तो KGF चॅप्टर 1 या चित्रपटानंतर अधिक ओळख फेमस झाला होता. यशच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगत आहोत. यशच्या प्रवासाची सुरुवात अतिशय खडतर झाली होती.

अशोक कश्यप दिग्दर्शित ‘नंदा गोकुळा’ या टेलिव्हिजन मालिकेतून यशने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत यश रॉकी या नावाने ओळखले जाते. यशचे बालपण म्हैसूर येथे गेले जेथे त्याचे शालेय शिक्षण महाजन हायस्कूलमध्ये झाले. त्याच्या अभ्यासानंतर, तो बिनाका नाटक मंडळात सामील झाला. यशने 2013 सालानंतर यशाची शिडी चढायला सुरुवात केली.

2018 मध्ये रिलीज झालेला KGF हा कन्नड सिनेमातील सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट होता. या चित्रपटाने जगभरात 250 कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यश हा एक प्रसिद्ध चेहरा बनला. आज यशच्या ‘KGF: Chapter 2’ ची देशभर प्रतीक्षा आहे. मात्र कोरोनामुळे चित्रपट थिएटर्समध्ये रिलीझ होत नसल्यामुळे निर्माते थांबले आहेत.

यश सुमारे 50 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. यशचा बंगळुरूमध्ये चार कोटी रुपयांचा आलिशान बंगलाही आहे. यशने गेल्या वर्षीच दुसरे घर घेतले होते. यशने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘त्यांचे वडील अजूनही बस ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. यश हे सामाजिक कार्यासाठीही ओळखले जातात. 2017 मध्ये त्यांनी यश मार्ग फाउंडेशन सुरू केले. या फाऊंडेशनने कोप्पल जिल्ह्यात 4 कोटी रुपये खर्चून एक तलाव बांधला आहे, ज्यातून लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळते.

यशने त्याची सह-अभिनेत्री राधिका पंडितशी लग्न केले. दोघे पहिल्यांदा मिस्टर आणि मिसेस रामाचारीला सेटवर भेटले. दोघांची एंगेजमेंट 12 ऑगस्ट 2016 रोजी गोव्यात झाली होती. त्यानंतर 9 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी बंगळुरूमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. इतकंच नाही तर यशने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी संपूर्ण कर्नाटकाला आमंत्रित केलं होतं. दोघांना दोन मुले आहेत.

ताज्या बातम्या
 ‘या’ दिवशी महाराष्ट्रात लागणार लॉकडाऊन; कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांनीच दिली माहिती
7 वर्षांच्या चिमुकल्याचं होतंय तोंडभरून कौतुक, आईला हार्टअटॅक येताच ‘असे’ वाचवले प्राण
फक्त २०० रूपयांची बचत करा आणि तब्बल २८ लाख मिळवून मालामाल व्हा; वाचा LIC च्या भन्नाट योजनेबद्दल..
शिक्षणक्षेत्राला अजून एक कलंक; मुंबईत शैक्षणिक अधिकाऱ्याच्या घरी सापडले कोट्यावधींचे घबाड

 

 

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now