Homeइतर7 वर्षांच्या चिमुकल्याचं होतंय तोंडभरून कौतुक, आईला हार्टअटॅक येताच ‘असे’ वाचवले प्राण

7 वर्षांच्या चिमुकल्याचं होतंय तोंडभरून कौतुक, आईला हार्टअटॅक येताच ‘असे’ वाचवले प्राण

कधी कधी मुलं अशी काही कामं करतात की त्यांना इतकी बुद्धी सुचली कुठून असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. अशीच एक घटना गुजरातमधील सुरत शहरात पाहायला मिळाली, जिथे एका 7 वर्षाच्या मुलाने आपल्या समजुतीने आईचा जीव वाचवला. डॉक्टरही मुलाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करत आहेत.

खरं तर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्या मुलाची आई बेशुद्ध पडली होती. अशा स्थितीत महिलेच्या 7 वर्षाच्या मुलाने मोबाईलवरून तात्काळ 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली आणि त्याच्या आईचा जीव वाचला. उशीर झाला असता तर महिलेचा जीव वाचवणे डॉक्टरांसाठी कठीण होते असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

डॉक्टरांनी त्या ७ वर्षांच्या चिमुकल्याचे तोंडभरून कौतुक केले. मिळालेल्या माहितीनुसार, मंजू पांडे ह्या यूपीमधील अयोध्येच्या रहिवासी आहेत. त्या सध्या पती आणि 7 वर्षांचा मुलगा राहुलसोबत गुजरातमधील सुरत शहरात राहत आहेत. बुधवारी मंजू पांडे ह्या आपल्या मुलासोबत त्यांच्या घरी होत्या तेव्हा त्यांची प्रकृती खालावली.

त्यांना उलट्या झाल्या आणि त्यांचे हातपाय थरथर कापू लागले. काही वेळाने त्या बेशुद्ध पडल्या. यावर 7 वर्षीय राहुलने आश्चर्यकारक समज दाखवत मोबाईल फोनवरून 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली. त्यानंतर मंजू पांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मंजू पांडे यांचे प्राण वाचले.

मंजूला आणण्यात थोडा वेळ लागला असता तर तिचा जीव वाचवणे कठीण झाले असते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, राहुलच्या बहिणीने एकदा त्याला सांगितले की, एखाद्याची तब्येत बिघडली तर इमर्जन्सी नंबर 108 वर कॉल करून अॅम्ब्युलन्स बोलावली जाते.

बहिणीने दिलेला धडा आता कामी आला आणि त्या धड्याचा चांगला उपयोग करून मुलाने आईचे प्राण वाचवले. डॉक्टरांनीही मुलाच्या समजुतीचे कौतुक केले. डॉक्टरांनी सांगितले की, मुले सहसा मोबाईलवर गेम खेळतात किंवा कार्टून पाहतात, पण मुलांना मोबाईलचा योग्य वापर करायला शिकवणेही खूप गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या
“पंतप्रधानांना धोका असेल तर पहिली गोळी मी खाईन” मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य
चिमुकला मुलगा आणि नवऱ्याचा मृतदेह पाहताच आईने फोडला हंबरडा
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला झाला कोरोना; अंत्यसंस्कारावेळी उपस्थित सर्वांचीच चिंता वाढली…
मोदींचा ताफा थांबलेल्या ठिकाणी सापडली पाकिस्तानी बोट; धक्कादायक माहिती आली समोर