Homeआर्थिकफक्त २०० रूपयांची बचत करा आणि तब्बल २८ लाख मिळवून मालामाल व्हा;...

फक्त २०० रूपयांची बचत करा आणि तब्बल २८ लाख मिळवून मालामाल व्हा; वाचा LIC च्या भन्नाट योजनेबद्दल..

चांगल्या भविष्यासाठी पैशांची बचत आणि जीवनाची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. तरच तुम्ही तुमची स्वप्ने सहज साकार करू शकता. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुम्हाला बचत आणि संरक्षणाची हमी देते. LIC ची अशी योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही केवळ करोडपती बनू शकत नाही, तर त्यात तुम्हाला जीवनाची सुरक्षा देखील मिळवू शकते. या पॉलिसीचे नाव LIC जीवन प्रगती पॉलिसी आहे.

एलआयसीच्या या प्लॅनमध्ये पैसे गुंतवून तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी चांगला परतावा मिळवू शकता. विशेष म्हणजे ते खरेदी केल्यावर बचत आणि सुरक्षितता दोन्हीची हमी दिली जाते. या दृष्टीने देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीची ही योजना गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकते. याशिवाय तुम्ही तुमचा प्रीमियम नियमितपणे भरत असाल तर या प्लॅनमध्ये डेथ बेनिफिटची सुविधाही उपलब्ध आहे. दर पाच वर्षांनी त्यात वाढ होत राहते. म्हणजे पाच वर्षांनंतर जेवढी रक्कम आधी मिळणार होती, त्यापेक्षा जास्त आहे.

जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर चांगला परतावा तर मिळतोच पण जोखीमही कमी असते. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने अशीच एक विशेष योजना सादर केली आहे, ज्याचे नाव आहे LIC जीवन प्रगती योजना. ही योजना अशा लोकांसाठी आहे जे जोखमीमुळे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरतात.

जीवन प्रगती योजनेच्या परिपक्वता लाभानंतर, तुम्हाला २८ लाख रुपये मिळतील. यासाठी तुम्हाला या योजनेत २० वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूकदाराला या पॉलिसीमध्ये दर महिन्याला ६ हजार रुपये म्हणजेच दररोज २०० रुपये गुंतवावे लागतील. ही पॉलिसी वयाच्या १२ व्या वर्षापासून सुरू करता येते. यामध्ये गुंतवणुकीचे कमाल वय ४५ वर्षे आहे.

पॉलिसी खरेदी केल्यानंतर पाच वर्षानंतर, विमाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, नामांकित व्यक्तीला या योजनेअंतर्गत मूळ विम्याच्या रकमेच्या १०० टक्के मिळतील. ६-१० वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास, नामांकित व्यक्तीला विमा रकमेच्या १२५टक्के रक्कम मिळेल.११-१५ वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास, विमा रकमेच्या १५०टक्के आणि१६-२० वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास, विमा रकमेच्या २००टक्के प्राप्त होईल.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात विश्वासार्ह कंपन्यांपैकी एक आहे. गाव असो की शहर, प्रत्येक भागातील माणसाला त्याची माहिती असते. त्यात वर्षानुवर्षे गुंतवणूक करून भविष्यात चांगली रक्कम उभी केली जाऊ शकते. यासोबतच इतरही अनेक फायदे यामध्ये मिळतात.

महत्वाच्या बातम्या
पोलिस स्टेशनमध्ये फुटला नवऱ्याच्या अश्रूंचा बांध; म्हणाला, “बायको भांडी घासायला लावते आणि..”
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला झाला कोरोना; अंत्यसंस्कारावेळी उपस्थित सर्वांचीच चिंता वाढली…
चिमुकला मुलगा आणि नवऱ्याचा मृतदेह पाहताच आईने फोडला हंबरडा