Homeक्राईमशिक्षणक्षेत्राला अजून एक कलंक; मुंबईत शैक्षणिक अधिकाऱ्याच्या घरी सापडले कोट्यावधींचे घबाड

शिक्षणक्षेत्राला अजून एक कलंक; मुंबईत शैक्षणिक अधिकाऱ्याच्या घरी सापडले कोट्यावधींचे घबाड

कमी वेळेत आपण कोट्याधीश व्हावे अशी लोकांची इच्छा असते. त्यामुळे कधी कधी लोक चुकीच्या मार्गांचा अवलंब करताना आपल्याला दिसतात. या लोकांमध्ये आता सरकारी कर्मचारी, अधिकारी हे देखील मागे राहिले नाहीत. सरकारी नोकरीमध्ये अनेक अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडली असून, लाच घेताना सरकारी अधिकाऱ्याला पकडले गेले. त्यांनतर त्याच्या घरात छापा टाकण्यात आला, तेव्हा घरातून कोट्यावधीचे घबाड समोर आले एवढी रक्कम पाहून अधिकारी देखील चक्रावले.

अटक करण्यात आलेला अधिकारी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणाचे सहसंचालक होता. या अधिकाऱ्याचे नाव अनिल जाधव आहे. यांना एसीबीने लाच घेताना अटक केले आहे. लाच घेताना पकडल्यानंतर एसीबीने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता कोट्यवधी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. तसेच घरातून कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

अनिल जाधव यांना मंगळवारी पाच लाख रुपयांची लाच घेताना मुंबईतील वांद्रे येथील कार्यालयातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनिल जाधव यांच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांच्या घरुन कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसीबीने अनिल जाधव यांच्या घरातून १ कोटी ६१ लाख ३८ हजारांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये ८१ लाख रुपयांची रोकडचा समावेश आहे. तर इतर वस्तूंमध्ये सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटे आणि दागदागिन्यांचा समावेश आहे.

माहितीनुसार, तक्रारदार हे एका शैक्षणिक अँकॅडमीत भागीदार आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ येथे त्यांच्या अँकॅडमी व त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सच्या मंजुरी करता जाधव यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. त्या संदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. यास २०२१ मध्ये पूर्व मंजुरी प्राप्त झाली. यावेळी या मंजुरीसाठी अनिल जाधव यांनी त्यांच्याकडे पाच लाखांची लाच मागितली होती.

त्यांना पाच लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून एसीबी अधिक तपस करत आहेत. एसीबीने त्यांच्या घर, कार्यालयात सर्च ऑपरेशन केले आहे. यामध्ये घरात ७९लाख ४६ हजार रुपयांची रोकड आणि एक किलो ५७२ ग्रॅम सोने मिळाले आहे. तर, कार्यालयातून २ लाख २८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

याआधी कानपूरमध्ये पियूष जैन नावाच्या अत्तर व्यापाऱ्यावर आयकर विभागानं छापा टाकला होता. या छापेमारीत १५० कोटी रुपायांची बेनामी मालमत्ता सापडली. व्यापारी पियुष जैन याचा कन्नौजमध्ये अत्तरांचा व्यापार होता. आयकर विभागानं छापा टाकल्यानंतर रात्रभर नोटांची मोजणी सुरू होती. या नोटा घेऊन जाण्यासाठी आयकर विभागानं ५० मोठे खोके आणि कंटेनर मागवले होते.
महत्वाच्या बातम्या
7 वर्षांच्या चिमुकल्याचं होतंय तोंडभरून कौतुक, आईला हार्टअटॅक येताच ‘असे’ वाचवले प्राण
रात्री अचानक घरी आलेल्या नवऱ्याने पत्नीला प्रियकरासोबत ‘त्या’ अवस्थेत पाहताच केले असे काही की वाचून थरकाप उडेल
पोलिस स्टेशनमध्ये फुटला नवऱ्याच्या अश्रूंचा बांध; म्हणाला, “बायको भांडी घासायला लावते आणि..”