कतरिनाने विकीच्या नावाच्या मंगळसूत्राचा फोटो केला शेअर, लोकं म्हणाली हिंदू धर्म मनापासून स्विकारलास

बॉलिवूड कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल हे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्न समारंभाच्या फोटोची चर्चा सर्वत्र होती. पण आज कतरिनाने भारतीय वधूप्रमाणे आपले मंगळसूत्र फ्लॉन्ट करत एक खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या फोटोमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे. कतरिनाने नवीन घरात आनंद साजरा करताना हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत कतरिनाने डेनिम पँटसह झिप्पर परिधान केलेले आहे. या फोटोचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कतरिनाने घातलेले मंगळसूत्र. कतरीना कैफने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना घराचा आणि हार्टचा इमोजी शेअर केला आहे.

कतरिना कैफचे हिऱ्याचे मंगळसूत्र हे डिझायनर सब्यसांचीच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील आहे. हे अतिशय महागड्या अश्या काळ्या आणि सोनेरी मोत्यांनी बनवलेले आहे. या मंगळसूत्रामध्ये शेवटी दोन हिरे जोडलेले आहेत. त्यामुळे हे मंगळसूत्र खास आहे. कतरिना कैफची आई ही ख्रिश्चन आहे आणि बाबा मुस्लिम आहेत.

कतरिना कैफचा जन्म ब्रिटनमध्ये झाला आहे. कतरीना कैफचे बालपण परदेशात गेल्याने तिच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा मोठ्या प्रमाणात असल्याचं अनेकदा जाणवतं. मात्र विकी कौशलसोबतच्या लग्नानंतर कतरिनाने हिंदू धर्म मनापासून स्वीकारला आहे. याच महत्वाचं उदाहरण म्हणजे कतरिनाच्या गळ्यातील मंगळसूत्र.

नवीन वर्ष साजरे करून विकी कौशल पुन्हा एकदा कामावर परतला आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नापासूनच चाहते दोघांचे एकमेकांवरील प्रेम पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. विकी कौशल या दिवसात त्याच्या आगामी चित्रपटासाठी इंदोर येथे शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.

नवीन वर्ष कतरिनासोबत सेलिब्रेट करण्यासाठी विकी कौशल सुट्टी घेऊन मुंबईत आला होता. सेलिब्रेशननंतर जेव्हा कतरिना विकी कौशलला ड्रॉप करण्यासाठी विमानतळावर आली, तेव्हा दोघांचे अनेक फोटो कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
सख्ख्या भावाशी नाव जोडताच रवीना टंडनची उडाली होती झोप; म्हणाली कुटुंबाची राखरांगोळी…
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात ७ हजार खुर्च्या पण ७०० लोकंच उपस्थीत, म्हणून दौरा रद्द केला – चन्नी
अजूनही वेळ गेलेली नाही, चला एक होऊया जितेंद्र आव्हाडांचे ओबीसी नेत्यांना आवाहन