Homeताज्या बातम्यापंतप्रधानांच्या कार्यक्रमात ७ हजार खुर्च्या पण ७०० लोकंच उपस्थीत, म्हणून दौरा रद्द...

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात ७ हजार खुर्च्या पण ७०० लोकंच उपस्थीत, म्हणून दौरा रद्द केला – चन्नी

पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच दौऱ्यावर असताना अचानक त्यांना शेतकऱ्यांचा सामना करावा लागल्यामुळे त्यांनी आपली सुरक्षा करताना पंजाब सरकार कमी पडल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी पंजाबचे चरणजीत सिंह चन्नी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर परतावे लागले याचे मला वाईट वाटते. पण सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती.दौरा रद्द करण्याचा निर्णय अंतिम क्षणी झाला, तो निर्णय त्यांच्या कार्यालयानेच घेतला. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात ७ हजार खुर्च्या होत्या, पण ७०० लोकंच उपस्थीत, म्हणून त्यांनी दौरा रद्द केला असावा, असे चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटले आहे.

तसेच आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणण्यासाठी मला भटिंडा येथे जायचे होते, पण माझ्यासोबत आलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे मी पंतप्रधानांना आणायला गेलो नाही. मी काही लोकांच्या संपर्कात होतो. जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे मला काळजी घेणे गरजेचे होते. असेही चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटले आहे.

खराब हवामानाबाबत आम्ही त्यांना सांगितले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला अचानक वळवल्याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेत कोणतीही त्रुटी आढळली नाही. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्ही चौकशी करू. पंतप्रधानांना कोणताही धोका नव्हता, असे चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षभरापासून शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत. मी शेतकऱ्यांवर लाठीमार करणार नाही. आम्ही रात्रभर शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. पण पंतप्रधान दौऱ्यावर आले असताना अचानक फिरोजपूर जिल्ह्यात काही आंदोलक जमा झाले. पंतप्रधानांवर हल्ला झाला नाही, असा विचारही नव्हता, असे चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटले आहे.

तसेच यापूर्वीही दिल्लीत शेतकरी आंदोलन झाले होते, त्यांची काही मागणी होती जी १ वर्षानंतर पूर्ण झाली. यावेळीही शांततेने आंदोलन करण्यासाठी कोणी रस्त्यावर आले तर त्याचा संबंध पंतप्रधानांच्या सुरक्षेशी जोडू नये, कोणीयी या प्रकरणावरुन राजकारण करु नये, असे चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते, जेथे ते फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते आणि त्यानंतर एका सभेला संबोधित करणार होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे दौरा न करताच त्यांना परतावे लागले.

महत्वाच्या बातम्या-
“पाकीस्तानपासून १० मिनीटांच्या अंतरावर PM ला सुरक्षा देता येत नसेल तर तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही”
PHOTO: दीराचा स्टायलिश फोटो पाहून इंप्रेस झाली कतरिना कैफ, दिली अशी प्रतिक्रिया
ज्याच्यामुळे बिकट परिस्थिती ओढवली ‘त्या’ नवऱ्यालाही लेकरासारखं सांभाळणाऱ्या सिंधुताई; वाचा ह्रदय हेलावनारा किस्सा..