Homeताज्या बातम्यासख्ख्या भावाशी नाव जोडताच रवीना टंडनची उडाली होती झोप; म्हणाली कुटुंबाची राखरांगोळी…

सख्ख्या भावाशी नाव जोडताच रवीना टंडनची उडाली होती झोप; म्हणाली कुटुंबाची राखरांगोळी…

अभिनेत्री रवीना टंडन बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक हिट चित्रपटात दिसून आली. आपल्या कौशल्याच्या आधारावर रवीनाने सिनेसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली आहे.

चित्रपटांमुळे चर्चेत राहण्यासोबत रवीना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही फार चर्चेत राहिली आहे. रवीनाच्या करियरच्या सुरुवातीला तिचे अनेक अभिनेत्यांसोबतच्या अफेअरबाबत अफवा पसरल्या होत्या. एकदा तर तिच्या सख्या भावासोबतही तिचे नाव जोडले गेले होते. याचा खुलासा स्वतः रवीनाने एका मुलाखततीत केला आहे.

रवीनाने ‘फिल्म कंपेनियन’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले की, ती तिच्या सहकलाकारांसोबतही मित्रांप्रमाणे वागत असत. मात्र, मासिकांच्या संपादकांना ते मान्य नव्हतं. रवीनाने म्हटले की, ‘मला आताही आठवतंय की, मी कित्येक रात्र झोपले नव्हते. सतत रडत होते. घाबरत होते की, दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात माझ्याबद्दल काय वाचायला मिळेल म्हणून?’

रवीनाने पुढे सांगितले की, ‘एकदा तर एका वर्तमानपत्राने माझी आणि माझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेची राखरांगोळी केली होती. हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं. माझं नाव माझ्या सख्ख्या भावासोबत जोडण्यात आलं’.

‘त्या वृत्तात लिहिण्यात आलं होतं की, एक रूबाबदार आणि गोरा मुलगा रोज रवीनाला सोडण्यासाठी येतो. आम्हाला माहिती मिळाली की, तो रवीनाचा बॉयफ्रेंड आहे’.

पुढे बोलताना रवीनाने सांगितले की, ‘धक्कादायक गोष्ट म्हणजे एका मोठ्या मासिकानेही कोणतीही शहानिशा न करता हा वृत्त दिला होता. पण या गोष्टींवर कोण स्पष्टीकरण देणार आणि कधीपर्यंत देत बसणार?’

रवीनाने पुढे म्हटले की, ‘आम्हाला या गॉसिपसोबतच जगावं लागत होतं. कारण त्यावर आपण किती म्हणून स्पष्टीकरण देणार. तसेच त्यावेळी आम्ही पत्रकार आणि संपादकांच्या दयेवरच मोठे होत होतो. आणि तेव्हा तुम्ही त्यांना हॅलो जरी म्हटलात तरी त्यावर ते अधिक मसाला घालत असत’.

महत्त्वाच्या बातम्या : 

ज्याच्यामुळे बिकट परिस्थिती ओढवली ‘त्या’ नवऱ्यालाही लेकरासारखं सांभाळणाऱ्या सिंधुताई; वाचा ह्रदय हेलावनारा किस्सा..

PHOTO: दीराचा स्टायलिश फोटो पाहून इंप्रेस झाली कतरिना कैफ, दिली अशी प्रतिक्रिया

ऋषभ पंतला महागात पडली हिरोपंती; आधी विरोधकांनी भडकवले, नंतर संघातील सहकाऱ्यानेच फसवले