महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. शिवाजी पार्कमध्ये संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. या हल्ल्या संदीप देशपांडे यांना गंभीर दुखापत झाली. संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी राज ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. नव्या दमाने, नव्या आयुधानसह नवनिर्माणास सज्ज, अशी टॅगलाईन घेऊन ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना मार्गदर्शन करत विविध मुद्द्यांवर भाष्य केला आहे.
संदीप देशपांडे यांच्यावर कुणी हल्ला केला असेल? तुमचा कोणावर संशय आहे? या प्रश्नांची उत्तरे देताना राज ठाकरे म्हणाले की, ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल, मग सगळ्यांना कळेल. माझ्या मुलांच रक्त वाया जाऊ देणार नाही कारण ते महाराष्ट्राची सेवा करतायेत. ते महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. या फडतूस लोकांसाठी नाही.
यादरम्यान, संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जीव घेणी हल्ला झाला. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग साठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात चार हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी भांडुपमधून तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. विकास चावरिया असे अटक केलेल्या आरोपांचे नाव आहे. तसेच पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. यावर प्रथमच राज ठाकरे यांनी भाष्य केल आहे. या घटनेनंतर संदीप देशपांडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
संदीप देशपांडे यांची विचारपूस करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. परंतु, यावेळी कोणतीच प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली नव्हती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात पुन्हा पेटणार राजकीय युद्ध! ‘या’ तीन मोठ्या नेत्यांनी ठोकला शड्डू, भाजप-शिंदेंचं टेंशन वाढलं
नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत का गेली? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगीतले खरे कारण, वाचून धक्का बसेल
आता राष्ट्रवादी शिंदेगटासोबत युती करणार? शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ