Politics: नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीचे सरकार स्थापन होत आहे. प्रथमच सर्वपक्षीय सरकार स्थापन होत आहे. म्हणजेच राज्यात एकही विरोधी पक्ष राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठे वक्तव्य केला आहे.
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागत, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गटाला पाठिंबा देणार का, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. अशा स्थितीत शिंदे गट खरोखरच आघाडीसाठी राष्ट्रवादीचे स्वागत करणार का, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. तसेच शिरसाट म्हणाले की, शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा करत आहेत.
दरम्यान, यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही आव्हान दिले आहे. घोषणा करून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकत नाहीत, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा विषय चर्चेचा मुद्दा ठरत आहे.
नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे.नागालँडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत मिळाल्यानंतरही राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळेच या समर्थनाची सध्या देशभर चर्चा होत आहे. आता यावर राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यादरम्यान, शरद पवार बोलतात एक आणि करतात एक.महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्यांसोबत आघाडीच्या घोषणा प्रत्यक्षात आणण्याचे काम शरद पवार यांनी केलंय. आता नागालँडमध्ये त्यांनी ५० खोके एकदम ओके ही घोषणा द्यावी. जे आरोप ते आमच्यावर करत होते, त्यांनी ते नागालँडमध्ये प्रत्यक्ष केले. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे पाहून ती घोषणा द्यावी, असही संजय शिरसाट यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात पुन्हा पेटणार राजकीय युद्ध! ‘या’ तीन मोठ्या नेत्यांनी ठोकला शड्डू, भाजप-शिंदेंचं टेंशन वाढलं
नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत का गेली? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगीतले खरे कारण, वाचून धक्का बसेल
शिंदेंनंतर आता राज ठाकरेंनीही साधला डाव; मुंबईत सेनेला भलमोठे भगदाड, ‘या’ नेत्यांचा मनसेत प्रवेश