Rahul Gandhi : कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आर. ध्रुवनारायण यांना आज पहाटे हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर आर ध्रुवनारायण यांना तातडीने डीआरएमएस रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वेळ निघून गेली होती. दवाखान्यात नेण्याआगोदर घरीच त्यांचा मृत्यू झाला होता. ध्रुवनारायण यांचे शनिवारी म्हैसूर येथे निधन झाले.
ध्रुवनारायण यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी कर्नाटक काँग्रेसच्या कार्याध्यक्षांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. कर्नाटक काँग्रेसने आजचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आर ध्रुवनारायण यांच्या छातीत दुखत होतं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांना सकाळी ६च्या दरम्यान रुग्णालयात आणले होते. पण तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. कर्नाटक काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून आर. ध्रुवनारायण यांच्या निधनाची बातमी देण्यात आली.
आर ध्रुवनारायण हे २००९ ते २०१९ या काळात कर्नाटकातील चामराजनगर मतदारसंघातून लोकसभा सदस्य होते. कर्नाटक काँग्रेसच्या भक्कम दलित नेत्यांमध्ये गणले जाणारे आर ध्रुवनारायण यांची गणना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीयांमध्ये केली जाते. ध्रुवनारायणाच्या अंत्यसंस्कारासाठी कर्नाटक काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते म्हैसूरला जाणार आहेत.
दरम्यान, ध्रुवनारायण यांच्या निधनानंतर राहुल गांधींनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, माजी खासदार आर ध्रुवनारायण यांच्या अशाप्रकारे निधन झाल्याने आम्ही दु:खी आहोत. ते तळागाळातील कष्टाळू आणि नम्र नेते होते. ते सामाजिक न्यायाचे चॅम्पियन होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
कोणत्याही पदावर नसताना सोमय्यांना FIR सर्वात आधी कशी मिळते? चौकशी करा, न्यायालयाचा दणका
महाराष्ट्र काॅंग्रेसमध्ये भूकंप! दिल्ली दरबारी मोठ्या हालचाली, ‘या’ बड्या नेत्याचे पद जाणार
भाजपला सर्वात मोठे भगदाड; ‘या’ बड्या नेत्याने सर्वांना चकवा देत केला काॅंग्रेसमध्ये प्रवेश