Congress: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एका पेक्षा एक मोठे भुकंप येत आहेत. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आठ राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.
मविआ या सरकारमध्ये महसूल मंत्री पदाची धुरा बाळासाहेब थोरात यांच्याकडे गेल्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ज्यामुळे त्यांना विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अध्यक्ष निवडणूक पद्धतच वादात सापडल्याने काँग्रेसला पुन्हा ते पद मिळालंच नाही.
कधी आपल्या वक्तव्य तर कधी आपल्या भूमिकांमुळे पटवले वादाच्या भोवऱ्यातच अडकुन राहिले. सत्यजित तांबे यांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याला पटोलेंना जबाबदार धरल होत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जेव्हा मविआची एकी दिसण गरजेच होत. तेव्हा मविआ ही काही नैसर्गिक आघाडी नाही या पटोलेंच्या वक्तव्यानेही सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
तांबेंच्या बंडा वेळी नाना पटोले यांना पदावरून हटवा अशी मागणी आशिष देशमुख यांनीही केली होती. तर दुसरीकडे नाना पटोल्यांसोबत काम करणं अवघड होत असल्याचं थोरात यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवसातच काँग्रेस मधील तब्बल २१ नेत्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र निरीक्षक रमेश चिन्निथा यांची भेट घेऊन नाना पटवले यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती.
त्यांनी म्हटले की, नाना पटोले यांचा मनमानी कारभार सुरू आहे. ते कुणाचंही ऐकत नाही आणि त्याच्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली असून त्यांना हटवण्यात यावा अशी मागणी या नेत्यांनी केली होती. त्यामुळे पटोलेंकडून दोन वर्षातच प्रदेशाध्यक्ष पद काढून घेणार का? असा प्रश्न उपस्थित झाला. यादरम्यान, आता नागपुरातील असंतुष्ट गट दिल्लीत जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात राज्यातील २२ काँग्रेस पदाधिकारी हायकमांडच्या भेटीला जाणार आहेत.
ते यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजू यांची देखील भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात दोन माजी खासदार, चार माजी आमदार, काही जिल्हाध्यक्ष तर इतर पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. यावेळी नाना पटोले यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलं आहे.
महत्वाच्या बातम्या
भाजपला सर्वात मोठे भगदाड; ‘या’ बड्या नेत्याने सर्वांना चकवा देत केला काॅंग्रेसमध्ये प्रवेश
मनुस्मृती जाळली, त्यावर पेटवली सिगारेट अन शिजवले चिकन; मुलीचा डॅशिंग व्हिडिओ व्हायरल
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा सख्खा भाऊ ईडीच्या ताब्यात; राजकीय वर्तूळात खळबळ