थंडीच्या दिवसात उबदार कपड्यांची विक्री झपाट्याने वाढते. मॉल आणि दुकानांमध्ये लोकरीचे कपडे विक्रीसाठी भरपूर येणार. पण त्यांच्या किमतीही तशीच जास्त असते. जास्त किंमतीमुळे हे कपडे अनेकांच्या बजेटबाहेर जातात आणि त्यामुळे लोक ते घेणं टाळत असतात. दुसरीकडे गरीबांबद्दल बोलायचे झाले तर ते तुम्हाला फाटक्या कपड्यात दिसत असतात.
पण आता गरिब लोकांना देखील स्वेटर घेता येणार आहे. तुम्हाला माहित आहे का की आपल्या देशात स्वेटर (sweater), ब्लॅंकेट आणि बुट मोफत दिले जातात. हा मॉल वर्षातील फक्त तीन महिने उघडतो आणि इथे लोकरीचे कपडे आणि बूट मोफत मिळतात. पण काही अटी आहेत.
लखनऊच्या रहीमनगर भागात एक अनोखा मॉल आहे. जिथे गरजू लोक स्वेटर ब्लॅंकेट आणि बुट मोफत दिले जातात. शुभचिंतकांनी दान केलेले हे कपडे रिक्षाचालक, मजूर, झोपडपट्टीत राहणारे आणि समाजातील इतर वंचित घटकांना हिवाळ्याच्या महिन्यांत थंडीशी लढण्यासाठी मदत करतात.
हा ‘अनोखा मॉल’ गेली पाच वर्षांपासून चालू आहे. वर्षातील तीन महिने हा माॅल चालतो. इतर वेळी दात्यांकडून गोळा केलेले लोकरीचे कपडे गरिबांना दिले जातात. त्यामुळे हा गरिबांसाठीचा असणारा माॅल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हा माॅल सकाळी १० ते ५ या वेळीत चालू असतो. त्या माॅलमध्ये चार कामगार आहेत. या माॅलमध्ये तुम्ही तुमच्याकडे असलेले कपडे देखील दान करू शकता आणि गरिब लोकांना मदत करू शकतात. हा माॅल अहमद रझा खान हे चालवतात.
दरम्यान, या अनोख्या मॉलमध्ये देणगीदारांची तसेच कपडे, बूट इत्यादींची योग्य नोंद ठेवली जाते. याविषयी बोलताना खान म्हणाले,गरजू लोकांना मदत करणाऱ्या या मॉलचा कोणीही गैरफायदा घेऊ नये म्हणून हे केले जाते. पूर्वी काही लोक इथून कपडे काढून बाजारात विकायचे.
महत्वाच्या बातम्या