प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या वेड चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ३० डिसेंबरला रिलिज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला असून हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. रितेशने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले आहे.
जेनेलियाचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तिनेही खुप चांगला अभिनय या चित्रपटात केला आहे. या चित्रपटाचे गाणेही आता लोकांना तोंडपाठ झाले आहेत. सुख कळले, वेड लावलंय ही गाणी खुप फेमस होत आहे. चाहते त्याच्यावर रिल्सही काढत आहे.
अशात रितेशने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांचा मुलगा ईशानकडे वेड लावलंय या गाण्यावर रिल्स करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ईशान खोपकरने वेड लावलंय गाण्यावर रिल काढून शेअर केली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रितेश त्याच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रिटिंनी या गाण्यावर रिल्स बनवल्या आहे. त्यानंतर रितेश देशमुखने ईशान खोपकरला सुद्धा एक मेसेज केला होता. त्यामध्ये तु माझ्या वेड लावलंय या गाण्यावर रिल बनवशील का? असे विचारण्यात आले आहे.
रितेश देशमुखचा मेसेज पाहून इशान चांगलाच खुश होतो आणि तो वेड लावलंय गाण्यावर रिल बनवून त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर करतो. याचा व्हिडिओ अमेय खोपकर यांनी सुद्धा शेअर केला आहे. तो व्हिडिओ सुद्धा खुप व्हायरल होत आहे.
दरम्यान, वेड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तो अनेक रेकॉर्ड मोडत असून बक्कळ कमाई सुद्धा करत आहे. आतापर्यंत वेडने बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
२०० तोळे सोन्याची चोरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी लढवली भन्नाट शक्कल, शेतकरी बनले अन्…
रामदास कदमांचा खेळ खल्लास! उद्धव ठाकरेंनी असा डाव खेळलाय की कदमांचे अवसानच गळाले
मोठी बातमी! मुस्लिम मुलाशी लग्न केलेल्या अभिनेत्री राखी सावंतला अटक; लावले ‘हे’ गंभीर आरोप