महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. ही इच्छा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर व्यक्त करण्यात आली आहे. आपले भावी आयुष्य वाचन आणि लेखनात घालवायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांना सर्व प्रकारच्या राजकीय जबाबदाऱ्यांपासून मुक्ती हवी आहे.
जारी केलेल्या निवेदनात भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे की, मला महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली ही अतिशय सन्मानाची बाब आहे. महाराष्ट्र संत आणि समाजसेवकांची भूमी आहे. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील जनतेकडून मला मिळालेले प्रेम मी कधीही विसरू शकत नाही.
या इच्छांबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो असल्याची माहितीही कोश्यारी यांनी दिली. पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर आले तेव्हा कोश्यारी स्पष्टपणे मोदींना म्हणाले की, त्यांना राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे. कोश्यारी यांच्या या इच्छेवर शिवसेनेतील ठाकरे गटातून प्रतिक्रिया आली आहे.
कोश्यारी यांनी पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवायला हवा होता, असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यपालांना हे कळाले हे त्यांच्यासाठी चांगलेच आहे असंही ते म्हणाले. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अशा प्रकारे राजीनामा दिल्याच्या चर्चेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे भगतसिंग कोश्यारी यांचा वादांशी असलेला संबंध अधिक घट्ट होत चालला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमावरून या वादांना सुरुवात झाली. त्या कार्यक्रमात कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहाबाबत वादग्रस्त विधान केले होते.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलं. याशिवाय गुजराती आणि मराठी समाजाबद्दलही त्यांनी विचित्र गोष्टी सांगितल्या होत्या. या सर्व विधानांमुळे उद्धव ठाकरे आणि इतर विरोधी पक्षांना सतत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
यावर भाजपकडून उघडपणे काहीही बोलले गेले नाही पण त्यांच्यासाठी आव्हाने वाढत होती. आता त्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर भगतसिंग कोश्यारी यांनीच राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता यावर सरकार काय भूमिका घेते? शिंदे सरकार काय प्रतिक्रिया देते? यावर सगळ्यांचे लक्ष आहे. अशा विधानांव्यतिरिक्त भगतसिंग कोश्यारी यांच्या काही निर्णयांनीही राजकीय उलथापालथ घडवून आणण्याचे काम केले होते.
2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी असो वा महाविकास आघाडी सरकारशी त्यांची प्रत्येकवेळी झालेले वाद असो. कोरोनाच्या काळात मंदिरे उघडण्याचा मुद्दा तापला असताना, खुद्द राज्यपालांनीच उद्धव ठाकरेंना पत्र लिहून नवा वाद निर्माण केला होता. आता भगतसिंग कोश्यारी खरोखरच राजीनामा देतात की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
अनोखा मॉल! इथे गरीबांना मोफत मिळतात स्वेटर, ब्लँकेट आणि बूट; पण ‘या’ एकमेव अटीवर
ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली झाली जेल, तीच पत्नी 12 वर्षांनंतर प्रियकरासोबत सापडली
सूर्या, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर महाकालेश्वरच्या दर्शनाला; पंतच्या प्रकृतीसाठी घातले साकडे
कथाकार देवकीनंदन ठाकूरांचे धीरेंद्र शास्त्रींना समर्थन, म्हणाले, सनातन धर्मालाच का लक्ष्य केले जाते?