IND vs SL | नुकताच टिम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये वनडे सिरीजमधील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने पुन्हा श्रीलंकेला धुळ चारली पण यावेळी श्रीलंकेने भारताच्या नाकी नऊ आणले होते. पण के एल राहुल एकटा भिडला आणि त्याने भारताकडे विजय खेचून आणला.
के एल राहुलने संथ गतीने धावा करत हळू हळू भारताकडे विजय खेचून आणला. त्याने 103 धावा चेंडूंमध्ये 64 धावा केल्या. जरी त्याने संथ गतीने धावा केल्या असल्या पण भारताच्या विजयात त्याचे मोलाचे योगदान होते. दुसऱ्या बाजूने कुलदीप यादवने त्याला साथ दिली. भारताने चार गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेने भारताला 219 धावांचं टार्गेट दिलं होतं.
सुरूवातीला रोहित शर्मा फलंदाजीसाठी आला पण चमिका करुणारत्नेने भारताला पहिला धक्का दिला. पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने रोहित शर्माला बाद केले. रोहित १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रीजवर आला.
रोहित शर्मानंतर दुसरा सलामीवीर शुभमन गिलही बाद झाला. गिल 12 चेंडूत 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. गिलला लाहिरू कुमाराने अविष्का फर्नांडोच्या हाती झेलबाद केले. श्रेयस अय्यर त्यानंतर फलंदाजीसाठी आला.
लाहिरू कुमाराने भारताला तिसरा धक्का दिला. गेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शतके झळकावणाऱ्या अनुभवी फलंदाज विराट कोहलीला त्याने बाद केले. नऊ चेंडूत चार धावा केल्यानंतर कोहली क्लीन बोल्ड झाला. 10व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कुमाराने विराटला बाद केले. त्यानंतर के एल राहुल आला आणि त्याने भारताला रुळावर आणले.
१५व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कसून राजिताने अय्यरला बाद केले. अय्यर यांनीही रिव्ह्यू घेतला, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्याने 33 चेंडूत 28 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार निघाले. अय्यरने चांगली सुरुवात केली पण त्याचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही.
त्यानंतर हार्दिक पांड्या आला पण त्यालाही खास अशी कामगिरी करता आली नाही. चमिका करुणारत्नेने भारताला पाचवा धक्का देत पांड्याला बाद केले. त्याने केएल राहुल आणि हार्दिक पंड्याची धोकादायक जोडी तोडली. हार्दिक आणि राहुल यांनी 119 चेंडूत 75 धावांची भागीदारी केली होती.
हार्दिक 53 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. हार्दिकचा झेल यष्टिरक्षक कुशल मेंडिसने घेतला. त्यानंतर एकट्या के एल राहुललने सामना पुढे नेला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि भारताने सिरीज आपल्या नावावर केली.
कुलदीप यादवने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत चौकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. यानंतर कुलदीप यादवसोबत या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरलेला केएल राहुलही खूप आनंदी दिसत होता. खेळपट्टीवर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारून अभिनंदन केले.
याशिवाय कर्णधार रोहित शर्मा सामना आणि मालिका जिंकल्याबद्दल भारतीय संघातील खेळाडू आणि कोचिंग स्टाफचे अभिनंदन करताना दिसला. त्याचवेळी स्टँडवर बसलेले चाहतेही जोरात भारतीय तिरंगा फडकवताना दिसले.
महत्वाच्या बातम्या
5 लाखांच्या हार्ले डेव्हिडसन बाईकवर दूध विकायला गेला ‘हा’ मुलगा, लोक म्हणाले, ‘शौक बडी चीज है’
राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराला हत्येच्या आरोपाखाली कोर्टाने ठोठावली १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
“गोपीचंद पडळकर हे स्वतः मंगळसुत्रचोर आणि पाकीटमार, त्यांना चोपल्याशिवाय राहणार नाही”
“गोपीचंद पडळकर हे स्वतः मंगळसुत्रचोर आणि पाकीटमार, त्यांना चोपल्याशिवाय राहणार नाही”