Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराला हत्येच्या आरोपाखाली कोर्टाने ठोठावली १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

Pravin Suryavanshi by Pravin Suryavanshi
January 12, 2023
in ताज्या बातम्या, राजकारण
0

राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचे तुरुंगात जाणे सुरूच आहे. भाजप वगळता इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांचे तुरुंगात आत-बाहेर जाणे सुरूच आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांसारख्या बड्या नेत्यांना तुरुंगवास झाला. काही दिवसांपूर्वीच नवाब मलिक हे तुरुंगातून बाहेर आले. परंतु अद्याप अनिल देशमुखांची तुरुंगातून सुटका झाली नाही. अशातच राज्याबाहेरील राष्ट्रवादीचे एकमेव खासदार मोहम्मद फैजल यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आहे.

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात मोहम्मद फैजल यांना १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लक्षद्वीपच्या करवत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाने या निर्णयाची सुनावणी केली आहे. मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे कार्यकर्ते मानले जातात.

२००९ साली हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २०१४ पासून मोहम्मद फैजल हे केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करत आहे. दरम्यान फैजल आणि अजून तीन दोषींचा जमीन न्यायालयाने नाकारला आहे.

२००९ च्या या प्रकरणात एकूण २३ आरोपी होते. या २३ आरोपींपैकी चार आरोपींना शिक्षा झाली आहे. मोहम्मद फैजल यांनी त्यांच्याच नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला केला होता. हा हल्ला केल्याप्रकरणी फैजल यांना दोषी ठरवण्यात आले होते.

एका शेडच्या बांधकामावरून झालेल्या वादात सलीह यांच्यावर एका गटाने प्राणघातक हल्ला केला होता. या गटाचे नेतृत्व फैजल यांनी केले होते असा त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपात म्हटले आहे. या हल्ल्यानंतर सलीह यांना केरळला उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर अनेक महिने उपचार करण्यात आले.

मोहम्मद फैजल हे लक्षद्वीपचे माजी लोकसभा सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीएम सईद यांचे जावई आहेत. या प्रकरणात दोषींवर एक लाख रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. राजकीयदृष्ट्या हे प्रेरित प्रकरन असून लवकरच मी वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करेल असे मोहम्मद फैजल यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या
amarjit pawar : नादखुळा! राष्ट्रवादीचा सरपंच झाला अन् पठ्ठ्याचा प्रण पुर्ण झाला, तीन वर्षांनंतर कापणार दाढी अन् केस
ncp : भाजपच्या गडात राष्ट्रवादीचा धुमाकूळ; ठाकरेंना धोका दिलेल्या खासदाराचा तर सुपडा साफ, एकाही जागी यश नाही
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून धोका; राज्यातील बड्या उघड केला आतला प्लॅन

 

Previous Post

नादच! रिक्षाचालकाने घरीच बनवली जबरदस्त बॉडी, वर्कआऊटचा व्हिडीओ पाहून अवाक व्हाल 

Next Post

भारताच्या ‘या’ कंजूस गोलंदाजाने इंग्लंडला १३१चेंडूत एकही धाव दिली नाही, आजच घडवला इतिहास

Next Post

भारताच्या ‘या’ कंजूस गोलंदाजाने इंग्लंडला १३१चेंडूत एकही धाव दिली नाही, आजच घडवला इतिहास

ताज्या बातम्या

mahrashtra rainfall 2

राज्यात आणखी किती दिवस अन् कोणत्या भागात पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती

March 21, 2023

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजप आणि ठाकरे गटाची युती; जाणून घ्या नेमकं काय घडलं..

March 21, 2023

विराट-अनुष्का बागेश्वरधामच्या धीरेंद्रशास्रींच्या चरणी नतमस्तक? वाचा व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य

March 21, 2023
udhav thackeray

उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या ‘या’ ४ सहकाऱ्यांच्या विरोधातच रचले कारस्थान; नावे वाचून धक्का बसेल

March 21, 2023
Eknath Shinde

शिंदेंनी असं काय केलं की १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एका क्षणात मागे घेतला संप? वाचा इनसाईड स्टोरी..

March 21, 2023

तरुण सतत शेजाऱ्याच्या पत्नीसोबत बोलायचा, नवऱ्याने अशी शिक्षा दिली की कुणाला सांगताच येणार नाही

March 21, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group