Politics: भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. नुकतीच काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडवळकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत असतात. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली. त्यांच्या त्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष अनिता भामरे यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
भामरे म्हणाल्या की, गोपीचंद पडळकर हे स्वतः मंगळसूत्रचोर आणि पाकिटचोर आहेत. तसेच गोपीचंद पडळकर यांनी नाशिक शहरात पाऊल ठेवल्यास आम्ही त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा अनिता भामरे यांनी दिला आहे.
त्याचवेळी बोलताना अनिता भामरे यांनी पडवळकरांनी केलेल्या टीकेचा जाहीर निषेध केला. स्वतः मंगळसूत्रचोर आणि पाकीटचोर आहेत आणि ते दुसऱ्याला चोर म्हणतात. शरद पवारांवर टीका करण्याची यांची लायकी तरी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पार्टीने मागच्या दरवाज्यातून आमदार केला आहे. त्यामुळे त्यांनी आमदार म्हणून जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत.
दरम्यान, बारामती चुलते – पुतणे चोरटे आहेत. ते दिवसा दरोडे टाकतात. राज्याची तिजोरी त्यांनी लुटून खाल्ली. शरद पवार म्हणजे जाणता राजा नसून नेणता राजा आहे’, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी बोचरी टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ गंभीर आजारमुळे श्रृती हसन होतेय लठ्ठ, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती; ‘अशी’ झालीये अवस्था
- विलासराव देशमुखांचे पुत्र अमित देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार; ‘या’ बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
- मोठी बातमी! आमदार बच्चू कडू भीषण अपघातात गंभीर जखमी; डोक्याला मोठी दुखापत