महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जितेन गजारिया या भाजपच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेवरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती.
त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगला. या प्रकारामुळे अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाणांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणावरून आता विद्या चव्हाण यांनी “वहिनी नोटीस मिळाली का?” असे उपरोधिक ट्विट करत अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
“बँक खाती हस्तांतरण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवीन नोटीस बजावली आहे. अमृता फडणवीस वहिनी नोटीस मिळाली का?”, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केलं आहे. काल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूर खंडपीठाच्या न्यायालयाने एक नोटीस बजावली आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार एसबीआय या सरकारी बँकेतून ऍक्सिस या खाजगी बँकेत वळविण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणावर अनेक नेत्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यांनतर या प्रकरणात उच्च न्यायालयात एक याचिका देखील दाखल करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय बँकेचे नुकसान झाल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता.
रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख डान्सिंग डॉल असा केला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कमालीच्या संतापल्या आहे. या वक्तव्यावरून अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्याचप्रमाणे विद्या चव्हाण यांच्या घरातील गृहकलह बाहेर काढत, त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत हल्ला चढवला.
“आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतःला, मगच मिळेल तुला निर्वाण!”, असा इशारा अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांना दिला होता.
महत्वाच्या बातम्या :-
मुंबईतील सर्वात महागड्या भागात उभा राहणार राकेश झुनझुनवालांचा महाल, किमंत वाचून हैराण व्हाल
सचिनची लाडकी सारा होणार ‘या’ घरची सुन? बीचवरील ‘तो’ फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण
आईच्या दुधातील ‘या’ गोष्टींमुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद