Homeआर्थिकमुंबईतील सर्वात महागड्या भागात उभा राहणार राकेश झुनझुनवालांचा महाल, किमंत वाचून हैराण...

मुंबईतील सर्वात महागड्या भागात उभा राहणार राकेश झुनझुनवालांचा महाल, किमंत वाचून हैराण व्हाल

देशातील अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांचे कुटुंब लवकरच त्यांच्या नवीन घरात राहण्यासाठी जाणार आहेत. शेअर मार्केटचे बिग बुल आता मुंबईतील सर्वात महागड्या भागात १४ मजली आलिशान महालात राहणार आहे. मुंबईतील सर्वात महागड्या अशा मलबार हिल भागात राकेश झुनझुनवाला यांचे आलिशान घर बांधले जात आहे.

मलबार हिल भागात भारतातील अनेक नामांकित उद्योगपती आणि प्रतिष्ठित व्यक्ती राहतात. याच भागात आता अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला त्यांच्या कुटुंबियांसोबत राहणार आहेत. सध्या ते एका दुमजली इमारतीमध्ये राहत आहेत. मलबार हिलमधील बी.जी. खेर मार्गावर राकेश झुनझुनवाला यांचा आलिशान १४ मजली बंगला बांधण्यात येत आहे.

सध्या या बंगल्याचे बांधकाम वेगाने सुरु आहे. याठिकाणी पूर्वी १४ फ्लॅट होते. ते फ्लॅट राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीने ३७१ कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता हे फ्लॅट पाडून या ठिकाणी नवीन बंगला बांधला जात आहे. या ठिकाणी एकूण २७०० चौरस फूट जागेवर ५७ मीटर उंचीचा आलिशान महाल बांधण्यात येणार आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्या नव्या घरात एक मोठा बेडरूम, स्वतंत्र स्नानगृह, ड्रेसिंग रूम आणि लिव्हिंग रूम असणार आहे. झुनझुनवालाच्या नवीन घरात एका मजल्यावर बँक्वेट हॉल, एका मजल्यावर स्विमिंग पूल, एका बाजूला जिम, एका मजल्यावर होम थिएटर अशा गोष्टी असतील. इमारतीच्या वरच्या मजल्यावर ७०. २४ चौरस मीटरचे संरक्षक क्षेत्र, री-हीटिंग किचन, पिझ्झा काउंटर, बाहेरील बसण्याची जागा, भाजीपाला बाग, स्नानगृह आणि टेरेस असेल.

या नवीन घरात त्यांची मुले ११व्या मजल्यावर राहणार आहेत. त्यांच्या मुलांसाठी दोन मोठ्या बेडरूम बांधल्या जात आहेत. बाल्कनी व्यतिरिक्त, दोन बेडरूमसह एक मोठा टेरेस देखील या घरामध्ये असणार आहे. या घरातील चौथा मजला पाहुण्यांसाठी असेल. या घरातील स्वयंपाकघर हे खूप मोठे असणार आहे.

या घरातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मध्यम आकाराच्या खोल्या, स्नानगृहे आणि स्टोरेज एरिया असतील. याशिवाय तळमजल्यावर फोयर, फुटबॉल कोर्ट बांधण्याचीही योजना आहे. तळघरात पार्किंगची जागा असेल. कुटुंबासाठी सात पार्किंग स्‍लॉट तयार केले जात आहेत. शेअर मार्केट किंग राकेश झुनझुनवाला यांच्या या नव्या घराची चर्चा सध्या होत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
सचिनची लाडकी सारा होणार ‘या’ घरची सुन? बीचवरील ‘तो’ फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण
आईच्या दुधातील ‘या’ गोष्टींमुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद
ड्रायव्हरचा मुलगा एकाच चित्रपटाने झाला साऊथ सुपरस्टार, टेलिव्हिजन मालिकेतून केली होती करिअरला सुरुवात,