Homeमनोरंजनसचिनची लाडकी सारा होणार 'या' घरची सुन? बीचवरील ‘तो’ फोटो व्हायरल होताच...

सचिनची लाडकी सारा होणार ‘या’ घरची सुन? बीचवरील ‘तो’ फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि शाहरुख खानची फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)चा सलामी फलंदाज शुभमन गिल यांच्याबद्दल सतत चर्चा होत असते. त्या दोघांच्या नात्यांबद्दल सोशल मीडियावर सतत चर्चा होतात. अनेकदा त्यांच्या खाजगी जीवनासंदर्भात अनेक अफवा देखील पसरवल्या जातात. त्यांच्या नात्याबद्दल खूप काही बोलले जाते, मात्र दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही. सध्या ते चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनी इंस्टाग्रामवरती टाकलेले फोटो.

या दोन्ही स्टार्सनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रत्येकी एक फोटो शेअर केला आहे. योगायोगाने या फोटोत शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर दोघेही समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहेत. साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कारमध्ये बसलेली आहे आणि साइड मिररमधून तिचा चेहरा दिसत आहे. त्याचवेळी गिलही बीचवर बसलेला दिसत आहे.

याशिवाय भारतीय कसोटी संघाचा सलामी फलंदाज शुभमन गिलने आणखी एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्याचे फोटो दिसत होते. तिच्या फोटोंमध्येही ती बीचवर असलेल्या रेठी फारू रिसॉर्टमध्ये दिसत आहे. एका फोटोत ती खूप आनंदी दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शुभमन गिल आणि वरुण धवन यांची भाची अंजनी धवनचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये दोघांच्या डिनर डेटची बातमीही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती.

याशिवाय सारा तेंडुलकरही काही दिवसांपूर्वी लंडनहून मुंबईत परतली होती, ती विमानतळावर स्पॉट झाली होती आणि एका व्हिडिओमध्ये ती डान्स करतानाही दिसली होती. सचिन तेंडुलकरच्या मुलीनेही अलीकडेच मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला आहे. तिचा एक जाहिरात व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये ती अभिनेत्री बनिता संधू आणि तानिया श्रॉफसोबत दिसत होती. याशिवाय त्याचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर फक्त काही क्रिकेटपटूंना फॉलो करते, त्यापैकी एक शुभमन गिल आहे. शुबमन गिलची बहीण शहनील गिलचेही नाव आहे. या दोघांमध्ये काहीतरी आहे, असे कोणतेही उत्तर अद्याप या दोन्ही स्टार्सकडून देण्यात आलेले नसले तरी सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा होत असते.

वास्तविक,आयपीएल २०२० मध्ये एका सामन्यादरम्यान, साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शुभमन गिल फिल्डिंग करतानाचा एक फोटो टाकला होता, जिथून त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या. याआधी शुभमन गिलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्याचवेळी, साराने तिच्या पोस्टचे कॅप्शन देखील तिच्यासारखेच ठेवले आहे. त्यानंतरही दोघांच्या अफेअरची चर्चा झाली होती.

महत्वाच्या बातम्या
उदयनराजे व्हिजन असलेले लीडर आहे, साताऱ्याने त्यांना जपले पाहिजे- नाना पाटेकर
शिक्षणक्षेत्राला अजून एक कलंक; मुंबईत शैक्षणिक अधिकाऱ्याच्या घरी सापडले कोट्यावधींचे घबाड
ड्रायव्हरचा मुलगा एकाच चित्रपटाने झाला साऊथ सुपरस्टार, टेलिव्हिजन मालिकेतून केली होती करिअरला सुरुवात,