शिवसेना आमदार तानाजी सावंत हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतेच तानाजी तानाजी यांनी यांच्या घरी भाजप नेते खासदार संभाजीराजे आले होते. त्यामुळे सावंत हे आता भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्च्यांना उधाण आले आहे. सावंत हे पक्षावर नाराज असून दुसरा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.
काल पक्षावर नाराज असलेल्या सावंत यांनी आपण पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर आता थेट संभाजीराजे यांच्यासोबत बैठक घेऊन सावंत यांनी पक्ष नेतृत्वाला जोरदार इशाराच दिला आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादीशी हात मिळवणी केल्यानंतर अनेक जुन्या नेत्यांनी आपला नाराजीचा स्वर वाढवला होता.
सोलापूर जिह्यातील माढा या ठिकाणी तानाजी सावंत यांचे चांगले वर्चस्व आहे. राजकारणासोबत सावंत यांनी सहकार, आर्थिक आणि शिक्षक अशा अनेक विविध क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. पुण्यातील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ हे त्यातीलच एक उदाहरण. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत.
तानाजी सावंत हे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व. सध्या ते उस्मानाबादमधील परंडा विधासभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार राहुल मेटेंचा पराभव केला होता. तानाजी सावंत हे एक अभ्यासू आणि निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादी आमदाराचा पराभव केल्यानंतर सावंत चांगलेच चर्चेत आले होते.
राज्यात शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र त्यामध्ये आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी सावंत यांना अपेक्षा होती. मंत्रिपद न मिळाल्याने सावंत हे पक्षावर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. एव्हडेच नाही तर ते पक्षाला राम राम ठोकून इतर पक्षाचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.
खासदार संभाजी राजे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सावंत हे भाजपमध्ये जाणार का ? असा सवाल अनेकांनी विचारला आहे. सावंत यांनी मात्र याबाबत अजून तरी कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे हे त्यांचे केवळ शक्तीप्रदर्शन आहे की ते खरच पक्ष बदलतात हे येणार काळच ठरवेल. तूर्तास तरी ते शिवसेनेमध्येच आहेत.
ताज्या बातम्या
राज्य सरकारची पोलीस प्रशासनाला ‘ती’ सूचना अन् एसटी कर्मचाऱ्यांना सोडावे लागले आझाद मैदान; वाचा काय घडलं?
जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण आले समोर; वाचून बसेल धक्का
ATM मधून पैसे काढणे होणार महाग, जाणून घ्या एका ट्रान्सेक्शनसाठी किती लागणार पैसे?
मोठी बातमी! कोरोनाने ‘या’ राज्यात केला कहर; शाळा-कॉलेज बंद, मास्क न लावणाऱ्याला ५०० रुपये दंड