Share

ब्राह्मणांचा दणका, बापट फॅक्टर अन् आणखी बरंच काही.., ‘ही’ आहेत भाजपच्या पराभवाची खरी ५ कारणे

BJP

BJP: गेल्या महिनाभरापासून पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या दोन विधानसभेच्या जागांच्या पोटनिवडणुकीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या निवडणुकीचा आज (२मार्च) निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून मत मोजणी सुरू झाली होती. पण पुण्यातील कसबा पेठ (Kasbah Peth) विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भापला कौल मिळवता आला नाही.

भाजप व महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. दोन्ही पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली होती. दरम्यान या निवडणुकीचा आज निकाल लागला आहे. मुक्ता टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणुक लागली. पण ही पोटनिवडणूक भाजप जिंकू शकले नाही.

भाजप पोटनिवडणुकीत हरण्याची अनेक कारणं समोर आली आहे. तसेच भाजपाचा अतिआत्मविश्वास नडल्याचे ही स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी मतदारसंघातून निवडून आलेल्या व्यक्तीचे निधन झाले. तर त्याच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जाते. पण यावेळी भाजपाने टिळक कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली नसुन त्यांच्या जागी दुसराच व्यक्तीला उमेदवारी दिला आहे.

यादरम्यान, राज्याच्या राजकारणात अलिखीत एक नियम असतो की, एकाद्या लोकप्रतिनिचे निधन झाले. तर उमेदवार न देता निवडणूक बिनाविरोधी करायची. पण सध्या ही प्रथा भाजपने मोडून काढली आहे . या सर्व गोष्टींचा फटका कजबा पेठमध्ये बसलेला दिसून येत आहे.

यादरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला आहे. या निवडणुकीसाठी भाजपने मोठी कसरत केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मैदानात उतरले होते. मात्र, रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवून पुन्हा एकदा काॅंग्रेसची ताकद दाखवून दिली आहे. रवींद्र धंगेकर यांनी या निवडणुकीत ११ हजार ४० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

तसेच गिरीश बापट सक्रिय नसल्यामुळे यंत्रणा देखील यावेळी सतर्क झालेली दिसली नाही. फडणवीस यांना स्विकारावे लागलेल उपमुख्यमंत्रीपद आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबाऐकवजी हेमंत रासने यांना दिलेली उमेदवारी यामुळे पुण्यात ब्राह्मण मतदारांमध्ये नाराजी पसरली. याचाच मोठा फटका भाजपला बसला.

महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंची मागणी सुप्रीम कोर्टानेही केली मान्य; निवडणूक आयोगाबाबत दिले ‘हे’ आदेश
कसब्यात जिंकले धंगेकर पण चर्चा बिचुकलेंना मिळालेल्या मतांची? वाचा बिचूकलेंवर किती मतांचा पाऊस पडलाय
कसब्यात कुणामुळे झाला पराभव? भाजपचे हेमंत रासने म्हणाले, माझ्या पराभवाला जबाबदार… 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now