Share

आशेने लावला कांदा अन् झाला वांदा! १७ गोण्या कांदा विक्रीनंतर १ रुपये नफा; उत्पादन खर्चही निघेना

जगभरात कांद्याची मागणी वाढली आहे. असे असतानाही कांद्याचे भाव घसरत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनाला आहे. मार्च महिन्यात कांद्याचे दर सातत्याने घसरत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कांद्याबरोबरच बटाट्याचे भाव देखील कमी झाली आहे. कांदा उत्पादक अक्षरशः उभ्या पिकात रोटा फिरवत आहे.

अहमदनगरच्या मार्केटमध्ये कांद्याला फक्त दोन रुपये भाव मिळाला आहे. आष्टी तालुक्यातील बावी नामदेव लटपटे या शेतकऱ्यांना ८ क्विंटल १३ किलो कांदा अहमदनगरच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला होता. मात्र बाजारातले भाव घसरल्यामुळे सर्व खर्च वजा करून शेतकऱ्याला केवळ एक रुपया मिळाला आहे. त्यामुळे तो शेतकरी हळहळ व्यक्त करत आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बावी येथे नामदेव पंढरीनाथ लटपटे यांनी तीन एकर शेतीत कांद्याची लागवड केली होती. यातील कांद्याच्या १७ गोण्या लटपटे यांनी अहमदनगर येथील मार्केटला विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र, या १७ पिशव्यांचा मोबदला त्यांना अवघा एक रुपया मिळाला आहे.

यावर बोलताना लटपटे म्हणाले की, कांद्याच्या एका गोणीसाठी शंभर रुपये खर्च करावा लागतो. तर १७ गोण्यासाठी मला एक रुपया मिळाला. मी तिथे दोन दिवस राहिलो. मला वाटलं पाच ते सहा हजार रुपये मिळतील. पण तिथे साध पोटाच खळग देखील भरायला मिळालं नाही.

लटपटे यांना अवघा एक रुपया मिळाल्यामुळे आता शेतकऱ्यांनी एक रुपयात जगायचं कसं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पैशासाठी शेतकऱ्याच्या दारात मजूर येऊन बसत आहे. त्यांना पैसे द्यायचे कुठून? हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.

यादरम्यान, आमचं जगणं मुश्किल झाला आहे. मुख्यमंत्र्यांचा एक रुपया पाठवण्याचा होता. पण त्यासाठी दहा रुपये लागत असल्यामुळे आम्ही तो निर्णय मागे घेतला, असे मनीषा लटपटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. पण एक शेतकरी काढण्यात रोटा फिरवत आहेत. कांदा उत्पादकांना कमालीचा तोटा सहन करावा लागत आहे.

महत्वाच्या बातम्या
..तर सोने खरेदी करणे बेकायदेशीर ठरणार; सोने खरेदीबाबतचा मोदी सरकारचा नवा नियम
रुग्णवाहिका बंद पडल्याने शिवसेना आमदाराचा मृत्यू; कुटुंबीयांनी केले ‘हे’ गंभीर आरोप  
शिंदे गटात उडाला बंडाचा भडका! एकनाथ शिंदेंनी तडकाफडकी केली ‘या’ बड्या नेत्याची हकालपट्टी

ताज्या बातम्या शेती

Join WhatsApp

Join Now