---Advertisement---

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये सापडल्या अळ्या; VIDEO शेअर करत थेट तुकाराम मुंढेंना केलं टॅग , म्हणाली…

Published On: September 11, 2026
Follow Us
---Advertisement---

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. एका न्यूट्रिशन प्रॉडक्टमध्ये अळ्या आढळल्याचा दावा बिपाशाने केला असून, या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी तिने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली आहे.

बिपाशाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संबंधित प्रोटीन पावडरचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती एका ग्लासमध्ये प्रोटीन पावडर ओतताना दिसत आहे. त्यानंतर पावडरमध्ये आढळलेल्या छोट्या अळ्याही तिने कॅमेऱ्यात दाखवल्या. एका अळीचा जवळून व्हिडीओ करत तिने संपूर्ण प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली.

अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करताना थेट तुकाराम मुंढे यांना टॅग केलं आहे. ग्राहकांना भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाची खाद्यपदार्थांची उत्पादनं मिळू नयेत, यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी विनंती तिने केली.

बिपाशाने आपल्या पोस्टमध्ये तुकाराम मुंढे यांच्याकडून या प्रकरणात मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र, अभिनेत्रीने केलेल्या दाव्याची अद्याप स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. तसेच संबंधित न्यूट्रिशन ब्रँड किंवा FDAकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया अथवा कारवाईची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

याआधी अभिनेत्री श्वेता तिवारीनेही ऑनलाइन मागवलेल्या एका पेयामध्ये झुरळ आढळल्याचा दावा केला होता. त्यावेळी तिनेही महाराष्ट्र FDAकडे या प्रकाराची तक्रार करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अन्नभेसळ आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. विविध हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांची तपासणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने मुंढे चर्चेत आहेत.

बिपाशा सध्या काय करतेय?

बिपाशा बासूने लग्न आणि मातृत्वानंतर अभिनयापासून काहीसं अंतर राखलं आहे. गेल्या काही वर्षांत ती मोठ्या पडद्यावर फारशी दिसलेली नाही. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डेंजरस’ या वेब सीरिजमध्ये ती शेवटची दिसली होती. दुसरीकडे, तिचा पती करण सिंह ग्रोव्हर मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे.

Related Posts

Leave a Comment