काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. गणेश नाईक आणि मी लिव्ह इनमध्ये राहत होतो, त्यांच्याकडून मला एक मुलगाही झाला आहे. आता ते मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आहे, अशी तक्रार एका महिलेने महिला आयोगाकडे केली होती. (women shocking allegation on ganesh naik)
१९९३ पासून गणेश नाईकांचे माझेसोबत संबंध असल्याचे त्या महिलेने म्हटले होते. तसेच लग्नाचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोपही त्या महिलेने केला होता. असे असताना आता त्या महिलेने पुन्हा एक धक्कादायक आरोप केला आहे.
आपल्या घरी आल्यावर गणेश नाईक नर्स किंवा शालेय विद्यार्थीनीचा गणवेश मला घालायला सांगायचे आणि नाचायला लावायचे. जर मी नाचायला नकार दिला तर मला ते बेदम मारहाण करायचे, असा खळबळजनक आरोप पीडित महिलेने केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना केलेल्या अर्जात पीडितीने हा आरोप केला आहे.
काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने महिला आयोगाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, गणेश नाईक माझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यापासून मला एक मुलगा झाला आहे. आता गणेश नाईक मला मारुन टाकण्याची धमकी देत आहे, असे महिलेने तक्रारीत म्हटले होते.
गणेश नाईक आठवड्यातून दोन-तीन दिवस माझ्यासोबत राहायचे. त्यांचे माझ्यासोबत शरीर संबंधही होते. तेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री होते. आता माझा मुलगा १५ वर्षांचा झाला आहे. त्याच्या शिक्षणाबाबत आणि भविष्याबाबत ठोस उपाययोजना करा, असे मी त्यांना सांगितले तर ते टाळा टाळ करत आहे, असेही संबंधित महिलेने तक्रारीत म्हटले होते.
तसेच मी काही बोलले की ते मला आणि माझ्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत आहे. पण माझ्या मुलाला न्याय मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तक्रार नोंदवत आहे, असे महिलेने म्हटले होते. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्यामुळे गेली ‘या’ चाहत्याची नोकरी? आपल्या कृतीवर आता होत असेल पश्चाताप
ईशान किशनने केली अंबानींची फसवणूक, मुंबईच्या पराभवानंतर संतापले चाहते, पडला मीम्सचा पाऊस
रणबीर-आलियाच्या रिसेप्शनचं ठिकाण बदललं, ताज हॉटेलमध्ये नाही तर ‘या’ ठिकाणी होणार लग्नाची पार्टी