कोल्हापूरची पोटनिवडणूक जवळ आली आहे. या निवडणूकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असे चित्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिथले राजकारण चांगलेच तापले आहे. असे असतानाच भाजप नेते धनंजय महाडिक यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. (women angry on bjp leader dhanajay mahadik)
महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे तिथले वातावरण चांगलेच तापले असून महिला त्यांच्याविरोधात मैदानात उतरल्या आहे. त्यांच्याविरोधात आज सर्वपक्षीय महिलांनी ताराराणी चौकात जोरदार आंदोलन केले आहे. यामुळे पोटनिवडणूक तोंडावर असताना भाजपसाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.
धनंजय महाडिकांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन कोल्हापूरात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून महिलांनी काळे ड्रेस आणि साडी परिधान करुन आंदोलन केले आहे.
एक रुपयांचा कडीपत्ता, मुन्ना झाले बेपत्ता, अशा घोषणा देऊन महिलांनी महाडिकांचा विरोध केला आहे. तसेच कोल्हापूर भाजपचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, धिक्कार असो, धिक्कार असो, महिलांचा अपमान करणाऱ्या मुन्नांचा धिक्कार असो अशा घोषणाही महिलांनी दिल्या आहे.
धनंजय महाडिक यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेसचे लोक येतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही एक महिला उभी केली आहे. ती बिचारी आहे. तुम्ही सगळ्या महिला आहात तर तिला मतदान करा. मला सांगा तुमचा पती एखादं प्लंबिंग काम करत असेल, तर तुम्हाला ते जमणार आहे का? तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तर तुम्हाला ते जमणार आहे का? ज्याचं काम त्यानेच करायचं असतं, असे धनंजय महाडिक यांनी म्हटले होते. त्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे त्या जागेवरुन त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या निवडणूकीला उतरल्या आहे. जयश्री जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे. त्यांच्या विरोधात भाजपने सत्यजित कदम यांना उतरवले आहे.
महत्वाच्या बातम्या-
नाद करा आमचा कुठं! शेतकऱ्याने पिकांच्या रक्षणासाठी अस्वल ठेवलं नोकरीवर, महिन्याला देतो ‘एवढा’ पगार
‘… त्यामुळे महाराष्ट्रातील अजान आम्ही बंद करणारचं’, भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
पुणे हादरलं! १७ वर्षीय अभिनेत्रीवर अश्लील व्हिडीओ बनवून दिग्दर्शकाने केला बलात्कार