काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. गणेश नाईक आणि मी लिव्ह इनमध्ये राहत होतो, त्यांच्याकडून मला एक मुलगाही झाला आहे. आता ते मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आहे, अशी तक्रार एका महिलेने महिला आयोगाकडे केली होती. (women allegation on ganesh naik)
१९९३ पासून गणेश नाईकांचे माझेसोबत संबंध असल्याचे त्या महिलेने म्हटले होते. तसेच लग्नाचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोपही त्या महिलेने केला होता. आता ती महिलाच सर्वांसमोर आली आहे.
पीडित महिलेने समोर आल्यानंतर पुन्हा काही धक्कादायक दावे केले आहे. तसेच आमची डीएनए चाचणी करा, आमच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही, माझ्या मुलाला वडिलांचे नाव मिळावे, अशी मागणीही यावेळी पीडित महिलेने केली आहे.
माझ्यावर अत्याचार झाला आहे. माझं शोषण झालं आहे. मला टॉर्चर केलं गेलं आहे, अशी धक्कादायक प्रतिक्रिया पीडित महिलेने दिली आहे. तसेच डीएनए टेस्ट केल्याशिवाय निर्णय लागू शकत नाही. त्यामुळे डीएनए टेस्ट करावी. जिथे जिथे मला मदत भेटेल तिथे तिथे मी जाणार असून माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही, असे महिलेने म्हटले आहे.
आमच्यासोबत सुरुवातीपासूनच भेदभाव होत आलाय. कुठेही आमचा स्वीकार केला गेला नाही. आम्हाला लपवून ठेवलं गेलं. नाईकांची माझ्या मुलाविषयी कोणतीही प्रेमाची भावना देखील नाही. मला पैश्याचा मोह नसून मुलाला वडिलांचे नाव मिळावं हीच माझी अपेक्षा आहे, असेही पीडित महिलेने म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महिलेने गणेश नाईकांवर गंभीर आरोप केला होता. आपल्या घरी आल्यावर गणेश नाईक नर्स किंवा शालेय विद्यार्थीनीचा गणवेश मला घालायला सांगायचे आणि नाचायला लावायचे. जर मी नाचायला नकार दिला तर मला ते बेदम मारहाण करायचे, असा खळबळजनक आरोप पीडित महिलेने केला होता. याप्रकरणी महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आलेली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘माझ्या चाहत्यांना वाईट सवय लागावी असं मला वाटत नाही’, अल्लू अर्जुनने नाकारली तंबाखूची ऍड
चहलने हॅट्रीक घेताच धनश्री वर्मा मैदानातच लागली उड्या मारायला; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
आवाराच्या बाहेर लाऊडस्पिकरचा आवाज नाही आला पाहीजे, नाहीतर…; मुख्यमंत्री योगींचे थेट आदेश