Share

भावी खासदार! गिरीश बापट यांच्या निधनानंतर तीनच दिवसात ‘या’ नेत्याचे बॅनर झळकले

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट (Girish BapatGirish Bapat) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे निधन होऊन तीन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. यासंदर्भात एक मोठी बातमी मोठी बातमी समोर आली आहे.

पुण्याच्या राजकारणावर तब्बल चार दशके प्रभाव टाकणारे गिरीश बापट यांच्या निधनाने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. पण दुसरीकडे पुण्यातील काही अतिउत्साही कामगारांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आज वाढदिवस असल्याने त्यानिमित्त शहरभर बॅनर लावण्यात आले आहेत.

कल्याणीनगर भागातील एका बॅनरवर जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे सुसंस्कृत राजकारणाचा वारसा लाभलेल्या पुण्याचे काय झाले, असा प्रश्न विचारला जात आहे. मुळीक यांचे समर्थक अतिक शेख यांनी जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणीनगर परिसरात बॅनर लावले होते.

त्या पोस्टर वर जगदीश मुळीक यांचा उल्लेख भावी खासदार असा आला. मात्र, हे बॅनर काही वेळातच काढण्यात आले. पण या पोस्टरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज भाजपचे अनेक कार्यकर्ते नेते झाले आहेत, ते बापटांच्या हाताखाली घडले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काॅंग्रेस पुणे लोकसभा पोटनिवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी टीका केली.

यादरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी ट्विट करून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, आशा शब्दात चव्हाण यांनी टीका केली.

महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी! शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकं काय शिजतय…  

७ वेळा लोकसभा जिंकलेल्या महाराष्ट्र काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा मृत्यू; ऐन संकटात पक्षावर कोसळला दुखाचा डोंगर
कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार दणका तर ठाकरे गटाला दिला मोठा दिलासा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now