प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना घडत असतात. या प्रेमापायी काहीवेळा लोकांचा जीवही जातो. आता एका महिलेने प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीचीच हत्या केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही संबंधित घटना घडली आहे. मृत व्यक्ती हा भाजप नेता असल्याची माहिती मिळत आहे (wife murder bjp leader)
उत्तर प्रदेशच्या नोएडाच्या मिर्झापूर गावात ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी नोएडा पोलिसांनी खुलासा केला आहे. नुकसान भरपाईची रक्कम आणि जमीन हडप करण्यासाठी स्थानिक भाजप नेत्याची हत्या करण्यात आली. ही हत्या त्याच्या पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून केली आहे. तिचा नवरा त्यांच्या प्रेमातही अडथळा ठरत होता.
मयताची ओळख पुसण्यासाठी हत्येनंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता. ही बाब उघड करत पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली. पोलीस उपायुक्त अमित कुमार यांनी सांगितले की, ९ फेब्रुवारी रोजी भाजपचे बूथ अध्यक्ष वीरपाल यांची हत्या करण्यात आली होती.
आता कोतवाली प्रभारी राजकुमार सिंह यांच्या पथकाने आरोपींना पकडले आहे. चौकशीत वीरपालची पत्नी नेहा हिचे मुकेश उर्फ सोनूसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. दोघांनी मिळून त्यांनी वीरपालची हत्या केल्याचे त्यांनी आता कबूल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहाला समजले की वीरपालला यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात एक कोटी रुपये आणि प्लॉट मिळणार आहे. या पैशाच्या आणि जमिनीच्या लालसेपोटी वीरपालच्या हत्येचा कट तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून रचला होता.
नेहा आणि मुकेशने भाजप नेत्याला मारण्यासाठी राजकुमार आणि भूदेव शर्मा यांना ५० हजार रुपये दिले. ९ फेब्रुवारीच्या रात्री चौघांनी त्याची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर अंगावर रॉकेल ओतून वीरपाल यांना पेटवून दिले. त्यानंतर मृतदेहावर चादर टाकून आरोपी पळून गेला. त्याने सांगितले की वीरपालला १३, ११ आणि ७ वर्षांची तीन मुले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
दोन्ही लेकरांना वडापाव खाऊ घातला अन् मुलांसह बापाने घेतली रेल्वेखाली उडी, जळगावातील भयानक घटना
मुंबई इंडियन्सची मोठी खेळी! जो खेळाडू म्हणाला, मी IPL नाही खेळणार, त्यालाच घेतले ८ कोटींना विकत
भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूला IPL ऑक्शनमध्येही नाही मिळाला भाव, बेस प्राईजवरच विकला गेला