Share

कोण आहेत प्रदीप कंद ज्यांच्यामुळे पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झाला विजय?

जिल्हा बँकेच्या क वर्ग सहकारी बँका व पतसंस्था गटात भाजपचे उमेदवार प्रदिप कंद यांचा विजय झाला आहे. त्यांच्या या विजयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने धमाकेदार विजय मिळवल्याने ही निवडणुक सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

असे पहिल्यांदाच झाले आहे की, जिल्हा बँकेच्या कारकिर्दीत विरोधी उमेदवाराने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला हरवले आहे. तसेच भाजपने पुणे जिल्हा बँकेत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. मंगळवारी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीला धक्काच बसला. प्रदिप कंद यांना ४०५ मते मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली होती.

प्रदिप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव करत विजय खेचून आणला. भाजप नेते प्रदिप कंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही निवडणूक कोण जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुरेश घुले यांना मैदानात उतरवण्यात आले होते. प्रदिप कंद यांचे आव्हान मोडित काढण्यासाठी राष्ट्रवादीने सगळी रणनिती आखली होती पण झाले उलटेच.

या लढतीची दखल स्वता अजित पवारांनी घेतली होती. त्यांनी प्रदिप कंद यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. अजित पवार म्हणाले होते की, प्रदिप कंद यांना त्यांची जागा दाखवा. पण मतदारांनी प्रदिप कंद यांनाच पाठिंबा दिला आणि सुरेश घुले यांचा पराभव झाला. महत्वाचे म्हणजे अजित पवारांच्या बारामतीतून प्रदिप कंद यांना निर्णायक ५२ मते मिळाली आहेत.

अजित पवारांनाही हा मोठा धक्का समजला जात आहे. विजय मिळवल्यानंतर प्रदिप कंद यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सर्व पक्षांनी केलेल्या मदतीमुळे माझा विजय शक्य झाला. अजित पवार यांना मला बोलण्याचा अधिकार आहे. मतं फुटली पण कोणती फुटली हे सांगणं योग्य नाही, असं ते म्हणाले. दरम्यान प्रदीप कंद कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. पुणे जिल्हा परिषदेत २०१४ साली विधानसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीकडून सुरूवातीला त्यांना उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंद यांना २०१४ मध्ये विधानसभा उमेदवारी हवी होती. पण त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले नाही.

त्यानंतर नाराज होऊन कंद यांनी २०१९ साली निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. खुप कमी लोकांना माहिती आहे की कंद हे फडणवीसांच्या जवळचे आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी कंद यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना पुण्यातील कोलंबिया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

तेथे उपचार घेतल्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या काळात त्यांची देवेंद्र फडणवीसांनी खुप साथ दिली होती. फडणवीस रोज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असायचे आणि त्यांच्या उपचाराचा आढावा घ्यायचे. फडणवीस रोज लिलावतीत फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचे असे स्वता कंद यांनी सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या
पालेकरांच्या १५ वर्षाच्या मेहनतीचे चीज झाले; आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात पहील्यांदाच मिळाली संधी
अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने रोवला विजयी झेंडा
निवडून येऊन चार तासही होत नाही तोच दरेकरांना धक्का; मुंबै बॅंकेच्या संचालकपदासाठी अपात्र
के एल राहुलच्या ‘त्या’ कृतीवर भडकले मैदानावरील पंच, मागावी लागली माफी, पहा व्हिडीओ

राजकारण

Join WhatsApp

Join Now