Homeखेळपालेकरांच्या १५ वर्षाच्या मेहनतीचे चीज झाले; आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात पहील्यांदाच मिळाली संधी

पालेकरांच्या १५ वर्षाच्या मेहनतीचे चीज झाले; आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात पहील्यांदाच मिळाली संधी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना एका कारणासाठी लक्षात राहणार आहे. कारण या सामन्यात पंच म्हणून अल्लाउद्दीन पालेकर यांनी पदार्पण केले आहे. १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांना कसोटी सामन्यात पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. अल्लाउद्दीन पालेकर यांचे वडिलही पंच आहेत.

त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “मी या गोष्टीसाठी खूप प्रतिक्षा केली आहे. या काळात मी खूप मेहनत घेतली आहे.” दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून पंच अल्लाउद्दीन पालेकर यांचा फोटो ट्विट केला आहे. “दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करणारे अल्लाउद्दीन पालेकर ५७ वे व्यक्ती आहेत.”

यावर पंच अल्लाउद्दीन पालेकर यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला धन्यवाद दिले आहेत. “माझ्यासाठी ही अभिमानाची वेळ आहे. क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम सुरू करताना प्रत्येकाचे लक्ष्य कसोटी सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्याचे असते. मी १५ वर्षांपूर्वी हे काम सुरू केले. त्यामुळे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. या काळात मी खूप संयमाने काम केले आहे”, असे पंच अल्लाउद्दीन पालेकर म्हणाले.

”मी पंच म्हणून काम करण्यासाठी खूप त्याग केला आहे. त्यासाठी मी अनेक कौटुंबिक कार्यक्रम आणि लग्नसोहळे सोडले आहेत. या प्रवासासाठी मी माझ्या पत्नीचे आभार मानू इच्छितो. माझ्या कठीण काळात ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली”, असे देखील पंच अल्लाउद्दीन म्हणाले.

अल्लाउद्दीन पालेकर यांचे वडिलही पंच म्हणून काम करत आहेत. त्यांचा उल्लेख करताना अल्लाउद्दीन म्हणाले की, “माझ्या वडिलांनी मला खूप प्रेरणा दिली आहे. त्यांना नेहमी प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्याची इच्छा होती. मात्र विविध कारणांमुळे त्यांना ती संधी मिळाली नाही. मात्र त्यांचे अनुकरण करून मी हे स्थान मिळवले आहे.”

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्याचा विक्रम अलीम दार यांच्या नावावर आहे. त्यांनी आत्तापर्यंत १३६ सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर या यादीत स्टिव्ह बकनर दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी १२८ सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. भारतातील एस. वेंकटराघवन या यादीत दहाव्या स्थानावर आहेत. त्यांनी ७३ क्रिकेट सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अजित पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने रोवला विजयी झेंडा
“लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात नव्हते, माझा ओबीसींवर विश्वास नाही”
निवडून येऊन चार तासही होत नाही तोच दरेकरांना धक्का; मुंबै बॅंकेच्या संचालकपदासाठी अपात्र