Share

कोण आहेत सी. आर. पाटील ज्यांनी एकनाथ शिंदेंना रातोरात सुरतला हलवलं? वाचा त्यांच्याबद्दल..

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेची काही मते फुटल्याचे समोर आले आहे. यादरम्यान काल संध्याकाळपासून शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे १३ आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे नेमके कोणते आमदार आहेत? त्यांची यादीही समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे पक्षावर नाराज होते.

विधानपरिषदेत १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटली असावीत असं बोललं जात आहे. शिवसेना गोटातील १० मतांचा सौदा झाल्याची माहिती समोर आली आहे. राजकारण तापताच उद्धव ठाकरेंनी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं.

शिवसेनेतर्फे तातडीची बैठक वर्षा या बंगल्यावर बोलावण्यात आली. निकालानंतर एकनाथ शिंदेंचा गट नाराज असल्याची चर्चा होती आणि नंतर ते थेट नॉट रिचेबल झाले. पण महाविकास आघाडीला धक्का देण्याचा प्लॅन हा आधीच ठरला होता. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर यामागे कोण आहे याचा अंदाज आला आहे.

मतदान पार पडताच शिंदे समर्थक आमदारांसह सुरतला रवाना होणार हे आधीच ठरलं होतं. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी ही खेळी केली असल्याचे बोलले जात आहे. यालाच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचं पाठबळ मिळालं. सी. आर. पाटील यांची अमित शहांनी भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांच्यात चर्चा झाली आणि हा कट शिजला होता.

मतदान झाल्यानंतर सुरतला रवाना व्हायचं हे एकनाथ शिंदेंनी आधीच ठरवलं होतं. मतदान झाल्यानंतर रातोरात गुजरातला रवाना व्हायची त्यांची सोय सी. आर. पाटील यांनी केली होती. सी. आर. पाटील यांनी खेळी केल्याच्या वृत्ताला स्वता संजय राऊतांनी दुजोरा दिला. सी. आर. पाटील हे अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या जवळचे नेते आहेत. राजकीय डावपेचांसाठी त्यांना ओळखलं जातं.

१९८९ मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता. २००९ साली त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणुक लढवली होती. त्यावेळी त्यांचा मतदारसंघ नवसारी होता. २०१४ मध्येही ते दुसऱ्यांदा निवडून आले. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळालेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचा देशात तिसरा क्रमांक होता.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्येही नाराजीचा सूर, ‘हे’ बडे नेते राजीनामा द्यायच्या तयारीत
एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणे आली समोर; शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यानेच केला खुलासा
मोठी बातमी! अखेर एकनाथ शिंदेंशी संपर्क झाला, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याला चर्चेसाठी बोलावलं सुरतला
शिवसेनेचे ‘हे’ ४ मंत्री आणि १७ आमदार गायब; बंडखोर आमदार आणि मंत्र्यांची नावे झाली उघड

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now