एकनाथ शिंदे यांनी बडोखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. यावेळी अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. पण मरेल पण उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे म्हणत ठाकरे गटात राहणारे राजन साळवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राजन साळवी सध्या एसीबीच्या कसोट्या सापडले आहेत.
पक्ष फुटीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र या दरम्यान विरोधी नेते मंडळींवर सातत्याने चौकशीचे फेरे सुरू आहेत. नुकतेच शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची सुध्दा चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या पाठोपाठ आता रामपूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना एसीबीने नोटिस दिले आहे.
एनसीपी ने दिलेल्या नोटिसानुसार साळवी यांच्या घराची कसून चौकशी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाचे अधिकारी त्यांच्या घराचे मूल्यांकन करत आहे. हे पाहून माध्यमांशी बोलताना राजन साळवी यांच्या भावना अनावर झाल्या. ते स्वतः ला रोखु शकले नाही. त्यावेळी ते ढसाढसा रडले.
ते म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून एसीबीकडून माझ्या मालमत्तेची कसुन चौकशी केली जात आहे. या चौकशीत मी अधिकार्यांना सगळी माहिती दिली आहे. तरी त्यांच समाधान झालं नाही. सतत मला बोलावले जात आहे. प्रश्न विचारले जात आहेत. माझ्या वडिलोपार्जित घराची त्यांनी मोजमाप केले.
मी हे घर हाॅटेल व्यवसायाच्या माध्यमातून उभा केल आहे. तसेच कमी पडलेल्या पैसे जमवण्यासाठी मी जनता सहकारी बँकेचं रत्नागिरीचं पंचवीस लाखाचं कर्ज आहे. त्या कर्जाचा हप्ता मी वेळेवर भरत आहे. माझ्या कष्टाच्या घराला आज टेप लावताना पाहायला मिळाल, अशी खंत राजन साळवी यांनी व्यक्त केली आहे.
यादरम्यान, माझा विश्वास आहे, आतापर्यंत जे मी कमवलं आहे ते स्वतःच्या कष्टातून उभ केल आहे. मला न्यायदेवतेवर संपूर्ण विश्वास आहे. माझ्या मागे लागलेला हा चौकशीचा फेरा येणार्या काळात लवकरच नाहीसा होईल, अशी आशा राजन साळवी यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
ठाकरेंनीच चूक केली, ते मुख्यमंत्री झाले नसते, आदित्यला मंत्री केले नसते तर…; ठाकरे गटातील खासदाराची थेट टिका
दूधधंद्यात कमावला बक्कळ पैसा; आज आहे १०० म्हशी आणि १०० एकर जमीनीचा मालक, वाचा यशोगाथा..
ठाकरेंनीच चूक केली, ते मुख्यमंत्री झाले नसते, आदित्यला मंत्री केले नसते तर…; ठाकरे गटातील खासदाराची थेट टिका