Ved: प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया यांचा ‘वेड’ (Ved) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट ३० डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल झाला आणि याने सर्व रेकॉर्ड मोडायला सुरूवात केली.
कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटाने बाकीच्या चित्रपटांना थिएटरमध्ये तगडी टक्कर दिली आहे. १६ व्या दिवशीची या चित्रपटाची घौडदोड कायम आहे. चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडमध्ये चांगला गल्ला जमवला आहे.
१६व्या दिवशी चित्रपटाने एकूण २.७२ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत ४४.९२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. वेड चित्रपट लवकरच ५० कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे. दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण करत रितेश देशमुखने वेड चित्रपट केला.
या चित्रपटाची कहाणी तीन व्यक्ती, संसार आणि प्रेम यांच्या भोवती फिरते. तर या चित्रपटातून रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया हिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्थ केले आहे. या चित्रपटात अशोक सराफ यांनी देखील उत्तम अभिनय केला आहे.
वेड चित्रपटाने अनेक बिग बजेटवाले चित्रपट मागे टाकले आहेत. बाॅलिवूड इंडस्ट्रीत दबंग म्हणून ओळखल जाणार अभिनेता म्हणजे सलमान खान होय. वेड चित्रपटात सलमान वेड या गाण्यात दिसला. या दोघांनी वेड चित्रपटाद्वारे चाहत्यांची मन जिंकली आहेत. दोघेही आपल्या अभिनयाने चित्रपटात मोहिनी घालत आहेत.
दरम्यान, वेड चित्रपटामुळे बाकीच्या चित्रपटांना झटका बसला आहे. कारण या चित्रपटाचे शो अजूनही हाऊसफुल चालले आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. रितेश देशमुखने दाखवून दिले आहे की, मराठी चित्रपटाची ताकद काय आहे.
महत्वाच्या बातम्या