प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट ३० डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल झाला आणि याने सर्व रेकॉर्ड मोडायला सुरूवात केली. कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे.
सिनेमॅटोग्राफीपासून कलाकारांच्या अभिनयापर्यंत सर्वांना आवडलेल्या मजिली या तेलगू चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे. रितेश देशमुखने वेड चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यामुळे चांगल्या अभिनेत्यासोबतच तो एक चांगला दिग्दर्शकही ठरला आहे.
या चित्रपटाने बाकीच्या चित्रपटांना थिएटरमध्ये तगडी टक्कर दिली आहे. १५ व्या दिवशीची या चित्रपटाची घौडदोड कायम आहे. चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडमध्ये चांगला गल्ला जमवला आहे. आतापर्यंत चित्रपटाने एकूण ४२.२० कोटींची कमाई केली आहे.
सैराट चित्रपटानंतर हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. यादरम्यान, वेड चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून सगळीकडूनच जेनेलिया आणि रितेशचं कौतुक केलं जात आहे. मराठीतील अनेक कलाकारांनी त्यांना शाबासकी दिली आहे.
रितेशच्या वहिनीनेही त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. रितेशची वहिनी म्हणजे त्याचा भाऊ अमित देशमुख यांची पत्नी. वहिनी आदिती देशमुखने फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, आम्ही ४१ कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यापुढेही जाऊ.
तसेच सैराट नंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट आहे. खुप खुप अभिनंदन रितेश आणि जेनेलिया देशमुख. तुम्ही दोघं या यशासाठी योग्य आहात, असेही रितेशच्या वहिनीने म्हटले आहे.
रितेशनं त्याच्या वहिणींची पोस्ट पाहता इन्स्टाग्रामवर ती पोस्ट रिपोस्ट केली आहे. रितेशने आपल्या वहिनीचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, खुप खुप धन्यवाद वहिनी. आता पुढे रितेशचा हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा पार करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
सरफराजऐवजी सूर्याला संधी दिल्यामुळे चाहते संतापले; आकडेवारी देत BCCI ला केलं ट्रोल
शेवटच्या क्षणी बदलला प्लान अन् तिथेच झाला घात! ४ जीवलग मित्रांचा विमानप्रवास ठरला अखेरचा
श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभूत करत भारताने रचला इतिहास; केली सर्वात मोठ्या विजयाची नोंद