vijay malokar leave uddhav thackeray group | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. बाहेर पडताना ते शिवसेनेचे ४० आमदारसोबत घेऊन बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसून येत आहे.
आता ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. अकोल्यातील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
मालोकार यांनी त्यांच्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विजय मालोकांरांच्या राजीनाम्यामुळे अकोल्यात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून विजय मालोकांरांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.
विजय मालोकार हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकांपैकी एक होते. शिवसेनेत जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे संचालक, सहसंपर्क प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. १९९९ मध्ये त्यांना बोरगावमंजू मतदार संघातून शिवसेनेकडून उमेदवारी दिली होती.
त्यानंतर मालोकार यांना दोन निवडणूकीत संधी देण्यात आली नाही. त्यामुळे ते अपक्ष उभे राहिले. त्यावेळी त्यांना ४० हजार मतं मिळाली होती. त्यामुळे त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर जनसुराज्य पक्षाचे उमेदवार म्हणून मालोकारांना ३० हजार मते मिळाली होती.
उत्कृष्ट संघटक म्हणून विजय मालोकार यांची ओळख आहे. पण आता त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मालोकार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते शिंदे गटात जातात की दुसरी राजकीय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
cyrus mistry : ‘या’ व्यक्तीमुळे झाला सायरस मिस्रींचा अपघात; अखेर खरे नाव आले समोर, गुन्हा दाखल
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून धोका; राज्यातील बड्या उघड केला आतला प्लॅन
Eknath shinde : एकनाथ शिंदेंनी तेव्हाच सांगीतल होतं…; महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट