sharad pawar on eknath shinde | महापुरुषांवरील आक्षेपार्ह विधाने, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अशा गोष्टींमुळे राज्याचे राजकारण खुप तापलेले आहे. तसेच महागाई, बरोजगारी अशाही गोष्टी वाढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने याचा निषेध करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी महाविराट मोर्चाचे आयोजन केले आहे.
शनिवारी मोर्चा असताना शुक्रवारपर्यंत याला परवानगी मिळाली नव्हती. आता मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी दिली आहे. या महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं की, लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. तेव्हा एकनाथ शिंदेंनीच महामोर्चाच्या परवानगीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
आता लोकांच्या मनात औत्सुक्य आणि राग आहे. राग याच्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्यात आली. जबाबदार लोकांनी केलेली ही विधाने सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहे. ते मोर्चात दिसेलच याचा मला विश्वास आहे, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मोर्चासंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या मोर्चाला परवानगी देण्यात पोलिसांना काहीच अडचण नाहीये. महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी ठरलेल्या मार्गांनुसारच हा मोर्चा काढावा.
या मोर्चाला परवानगी देण्यात तर आली आहे. पण काही अटीही असणार आहे. या मोर्चामध्ये शस्त्र, पुतळे, लाठ्या वगैरे घेऊन जाण्यास मनाई आहे. तसेच कोणाच्याही भावना दुखावतील अशाप्रकारची वक्तव्ये मोर्चामध्ये करण्यास बंदी आहे. मोर्चामुळे वाहतूकीत अडणच येणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
sanjay raut : आता संजय राऊतांची जीभ घसरली; बाबासाहेब आंबेडकरांबाबत केले वादग्रस्त विधान; म्हणाले…