prakash ambedkar warning uddhav thackeray | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि इतर भाजप नेते यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे. अशात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मुंबईमध्ये महामोर्चाचे आयोजन केले होते.
या मोर्चाला शेकापसोबत डाव्या पक्षांनीही पाठिंबा दिला होता. अशात इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा या महामोर्चावर प्रतिक्रिया दिल्या आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना येणाऱ्या धोक्याची जाणीव करुन दिली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या जनतेत रोष आहे. तर दुसरीकडे निर्माण झालेला सीमाप्रश्न हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कॅरेक्टर दाखवणारा मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या सीमेवरील अविकसित गावांनी कर्नाटक, गुजरात, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जबाबदार आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
तसेच शिवसेना या पक्षांसोबत आंदोलनात सामील झाली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचे शिंतोडे शिवसेनेवरही उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या दोन पक्षांशी राजकीय तडजोड करावी. मात्र त्यांच्यासोबत पण प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेताना विचार करावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
या मोर्चातून शिवसेना आपली ताकद दाखवेल याबाबत माझ्या मनात कोणतीच शंका नाही. शिवसैनिकांमध्येही उत्साह आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ताकदीवरच रस्त्यावर उतरा, असे मी ठाकरेंशी भेटलो तेव्हा बोललो होतो. पण ते म्हणाले होते की, सत्तेत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीलाही समजून घ्यावं लागतं, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.
दरम्यान, वंचित बहूजन आघाडी शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रयत्न करत आहे. पण याला शिवसेनेकडून हवे तसे उत्तर मिळत नाहीये. अशात प्रकाश आंबेडकरांनी थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावरच टीका केली आहे. त्यामुळे आता याला ते काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
prakash ambedkar : …तर ‘या’ प्रकरणामुळे शिवसेनेवरही शिंतोडे उडतील; प्रकाश आंबेडकरांनी सांगीतला मोठा धोका
mahesh tilekar : स्वप्नील जोशी आणि पोंक्षेंना हिंदु धर्मासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मिळाला पुरस्कार, तर भडकला दिग्दर्शक म्हणाला…
shivsena : शिंदेंना दणका! ‘या’ जिल्ह्यात शिंदे गटात गेलेले सगळेच्या सगळे शिवसैनिक पुन्हा ठाकरे गटात दाखल