Share

कमाईच्या बाबतीत सैराटला मागे टाकणार ‘वेड’; ९ दिवसातच तोडला सैराटचा रेकॉर्ड, कमावले ‘इतके’ कोटी

Ved Movie: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहे. तसेच त्याने मराठी चित्रपट सृष्टीत देखील काम केल आहे. रितेश देशमुखचा ‘लयभरी’ चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

यानंतर रितेश देशमुखने एक भावनिक चित्रपट बनवला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपट सध्या बाॅक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख देखील आहे. हा चित्रपट आठवड्याभरापूर्वी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता.

मराठी चित्रपट दुनियादारी, लयभारी, सैराट आणि नटसम्राट यांनी प्रचंड कमाई केली आहे. सैराट चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात तब्बल 25 कोटींचा गल्ला जमावला होता. मात्र ‘वेड’  चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात जबरदस्त कलेक्शन करून अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. ‘वेड’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 21 कोटींचा टप्पा पार केला आहे.

सैराटने 110  कोटींंची कमाई करुन 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. आता हे रेकाॅर्ड वेड चित्रपट तोडतो का हे पाहणं  महत्वाच ठरणार आहे. पहिल्याच आठवड्यात वेड चित्रपट 5व्या स्थानावर पोहचला आहे.

‘वेड’ चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुखने केले आहे. जेनेलियाने या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. या दोघांनी वेड चित्रपटाद्वारे चाहत्यांची मन जिंकली आहेत.

सेलिब्रिटी कपलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रितेश जेनेलिया कित्येक वर्षानंतरसोबत काम करताना दिसून येत आहे. ‘वेड’ चित्रपटाच्या तुलनेत इतर बॉलिवूड चित्रपटांची जादू मात्र फिकी पडली आहे. त्यामुळे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now