sanjay kadam revealed shocking thing about yogesh kadam accident | शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात अनेकजण घातपाताचा संशय व्यक्त करत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा हा घातपात असल्याचे म्हटले होते. पण आता राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी या प्रकरणी वेगळेच वक्तव्य केले आहे.
रामदास कदम यांच्याशी संबंधित एक बंगाली बाबा आहे, त्यांनीच हा अपघात घडवून आणला आहे, अशी चर्चा दापोलीत सुरु असल्याचे संजय कदमांनी म्हटले आहे. त्यामुळे आता संजय कदमांच्या या वक्तव्यामुळे याप्रकरणाला वेगळेच वळण आले आहे.
योगेश कदमांच्या अपघातामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय. पण खेडमध्ये असलेल्या बंगाली बाबांना त्यांचा शिधा मिळाला नाही. त्यामुळेच हे कारस्थान रचण्यात आलं आहे का? असा सवाल संजय कदम यांनी उपस्थित केला आहे. ते शनिवारी खेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
संजय कदम यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे रामदास कदमांंवर निशाणा साधला आहे. बंगाली बाबा कोणाच्या गाडीतून फिरत असतो? हे डुप्लिकेट सेनेचे नेतेच सांगू शकतात. बंगाली बाबाला शिधा न मिळाल्यामुळे घाटात कोणी काय कोंबडी-कुत्रं पुरलं, हे सांगू शकतात, असेही संजय कदमांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, बंगाली बाबांनी त्यांना सांगितलं होतं की, तुमच्या नारळाच्या बागेत लिंब-कोंबडं कापलेलं आहे. त्यानंतर ते तिथे गेले तेव्हा खरंच तिथे ते कापलेले होते. त्यानंतर बंगाली बाबाने एका भक्ताला सांगितले की शिधा मिळवण्यासाठी आम्हीच तिथे ते कापून ठेवले होते. योगेश कदमांच्या अपघाताचंही हेच कारण असावं.
स्वत:च्या भावाचे नुकसान करण्यासाठी रामदास कदमांनी अनिल परब यांच्या नावाचा वापर केला. रामदास कदम हे काय आहे हे जनतेला माहिती आहे? जे सख्ख्या भावाचे नाही होऊ शकले ते जनतेचे काय होणार आहे?, असेही संजय कदमांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘ही’ गोष्ट जर उद्धव ठाकरेंना समजली तर ते आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलेने मारतील
surpriya sule : उर्फी जावेद प्रकरणात आता सुप्रिया सुळेंची उडी; फडणवीसांना म्हणाल्या, देवेंद्रजी…
Yogesh Kadam : योगेश कदमांचा अपघात नाही तर घातपात; मातोश्रीच्या आशीर्वादाने अनिल परबांचा कदमांना संपवण्याचा प्रयत्न..