ठाकरेंच्या जवळच्या माणसानेच केला घात? आयोगाच्या कागदपत्रांतून धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगामध्ये सुरु असलेल्या लढाईत तर शिंदे गटाने विजय मिळवल्याचे दिसून आले.

हे सगळं सुरु असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील एका खासदाराने  शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगातील कागदपत्रांमधून हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

शिवसेनेच्या अनेक खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एक खासदार शिंदे गटात जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून २४ ते २५ लाख कागदपते देण्यात आली होती. त्यानुसार, सर्व खासदार, आमदार, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख सगळ्यांनी प्रतिज्ञाापत्र सादर केली होती.

शिवसेनेचे ४० आमदार शिंदे गटात गेले होते त्यानंतर १३ खासदार शिंदे गटात गेले होते. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या गटातील एका खासदाराने शिंदे गटाच्या बाजूने पत्र दिल्यामुळे तो खासदाराही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

अनेक नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. चिन्ह आणि नाव गेल्याने एवढा काही फरक पडत नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे. त्यांनी यावेळी इंदिरा गांधी आणि काँग्रेसचे उदाहरण दिले आहे.

हा तर निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्याचा निकाल लागल्यानंतर काही चर्चा करता येणार नाही. मला आठवतं काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि इतर हा वाद झाला होता. त्यावेळी काँग्रेसचे चिन्ह बैलजोडी होती. पण ती निवडणूक आयोगाच्या निकालाने गेली. त्यानंतर काँग्रेसने हात हे चिन्ह घेतले, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, लोकांनी हे चिन्ह मान्य केलं. त्यामुळे चिन्हाचा फार काही फरक पडत नाही. तसेच शिवसेनेचं नवं चिन्ह लोक मान्य करतील. ही चर्चा अजून महिनाभर चालणार आहे. पण तो निवडणूक आयोगाचा निकाल आहे.

महत्वाच्या बातम्या-
कसब्यात बापट व्हिलचेअरवरून प्रचाराला येताच प्रतिस्पर्धी उमेदवार गहीवरला; थेट माघारच घेतली
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदेंना मिळणार हे माहित होतं कारण…; फडणवीसांनी दिली हैराण करणारी प्रतिक्रिया 
राज्यपाल कोश्यारींचा जाता जाता शिंदे गटाला जोरदार दणका; वाचा आता नेमकं काय केलं