गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर आपण खरी शिवसेना असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी शिवसेना चिन्हावर आणि नावावर दावा केला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने याबद्दल निकाल दिला आहे.
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देणारा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या याचीच चर्चा होत आहे. अनेक राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देत आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लोकशाही आणि भारतीय घटनेचा हा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता. आम्ही बंड केलं त्यानंतर कायदेशीर लढाई लढली. निवडणूक आयोगाकडे सगळी कागदपत्र आम्ही सादर केली. त्यानंतर हा निर्णय आला, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहै.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, शिंदेंच्या गटाला नाव आणि चिन्ह मिळालं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. एकनाथ शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. शिवसेनेला पुढे नेण्याचं काम शिंदे करत आहे. ज्यांच्याकडे शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे विचार आहे तिच खरी शिवसेना हे आम्ही आधीपासून सांगत होतो.
आम्हाला याचा विश्वास होता की नाव आणि चिन्ह हे शिंदेंनाच मिळेल. कारण याआधी निवडणूक आयोगाने पक्षफुटीवर घेतलेले सर्व निर्णय असेच दिले होते. जसा पक्ष मतदारांच्या आधारावर असतो, तसं पक्षाचे नाव आणि चिन्ह हे आमदार आणि खासदारांवर असते, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज्यपाल कोश्यारींचा जाता जाता शिंदे गटाला जोरदार दणका; वाचा आता नेमकं काय केलं
राहूलने १० फूट हवेत उडत चित्याच्या चपळाईने पकडला जबरदस्त झेल अन् बचावली टिम इंडीया; पहा व्हिडीओ
शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…