भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. ते कसब्याच्या आमदार होत्या. त्यांच्या निधनानंतर कबस्यात पोटनिवडणूक लावण्यात आली आहे. यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे. या निवडणूकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली गेली नाही. त्यामुळे ही निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता आहे.
हेमंत रासने यांना या निवडणूकीत उमेदवार म्हणून भाजपने घोषित केले आहे. तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार जोरदार प्रचार करत आहे. असे असतानाच भाजप खासदार गिरीश बापट हे प्रचारासाठी आले होते.
या निवडणूकीत भाजपने ब्राम्हण उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. त्याचा परिणाम मतांवर होऊ शकतो. अशात गिरीश बापट हे खुप आजारी आहे. असे असतानाही ते प्रचारासाठी आले होते. पण त्यांना प्रचारात सक्रीय राहता येणार नाही. आता यावर ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
बापटांना पाहून पर्रिकरांची आठवण आली. बापट साहेबांना त्रास होत आहे. तरी देखील ते प्रचारात उतरले आहेत. त्रास साहेबांना होतोय पण यातना आम्हाला होत आहे. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे. याचा त्रास आम्हाला होत आहे. त्यामुळे मी आज व्यक्तिश: प्रचार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे, असे आनंद दवे यांनी म्हटले आहे.
गुरुवारी गिरीश बापट हे कसब्याच्या प्रचारासाठी आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यानंतर गिरीश बापट यांनी निवडणूकीच्या प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पण प्रचारादरम्यान ते खुप आजारी असल्याचे दिसून आले.
प्रचारावेळी गिरीश बापट यांच्या नाकात नळी आणि बाजूला ऑक्सिजन सिलेंडर होते. व्हिलचेअरवर असतानाही ते प्रचारासाठी आलेले दिसले. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट खुप आजारी आहे. त्यामुळे ते कसबा निवडणूकीच्या प्रचारात सहभागी झाले नव्हते. पण आता ते मैदानात उतरले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदेंना मिळणार हे माहित होतं कारण…; फडणवीसांनी दिली हैराण करणारी प्रतिक्रिया
शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनाच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण; निवडणूक आयोगाचा निर्णय