Share

गद्दारी करणाऱ्या किर्तीकरांवर उद्धव ठाकरे भडकले; घडवली जन्माची अद्दल, मुलाला मात्र..

Shivsena: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या गटाचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर शुक्रवारी (११ नोव्हेंबर) एकनाथ शिंदे यांच्या सेनेत दाखल झाले आहेत. त्याचा एक फोटो समोर आला असून त्यात ते एकनाथ शिंदेसोबत दिसत आहे. यामध्ये शिंदे हे गजानन यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत.

गजानन हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. २०२२ मध्ये बदलत्या घडामोडींमध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर कीर्तिकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे खासदार गजानन हे १३वे शिवसेनेचे खासदार आहेत. ज्यांना पक्षाच्या ५६ पैकी ४० आमदारांचा आधीच पाठिंबा आहे.

जून महिन्यात बदललेल्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. तेव्हा उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात सत्तेतून हद्दपार व्हावे लागले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तर ११ नोव्हेंबर २०२२ रोजी ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले.

बंगल्यावर गेल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी आता ते बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला.

यावेळी गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. अशी माहिती मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. तर गजानन कीर्तिकर याचा मुलगा अमोल कीर्तिकर याने उद्धव ठाकरेची शिवसेना या पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गजानन कीर्तिकर यांचे स्वागत केले. तसेच त्यांनी ट्विट केले की, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय खासदार गजानन कीर्तिकर यांनी अधिकृतपणे बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या-
Rahul Dravid : भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्येही खेळण्याची परवानगी दिली पाहीजे; पराभवानंतर द्रविडची मागणी
Cricket: घरात एकच बाप असावा, सात सात बाप असतील तर..; जडेजाची टिका रोहीत शर्माला झोंबणार
शामी-भुवीच्या निष्काळजीपणावर संतापला रोहित; चालू मॅचमध्येच झाप झाप झापले, व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now