Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक भूकंप आले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच नेतृत्व अमान्य करत भाजपाच्या साथीने वेगळी चूल मांडली. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका टिपणी करत आहेत.
मध्यंतरी शिवसेनेचे दोन गट पडले. पण त्यावेळी शिवसेना नक्की कोणाची हा मोठा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर निवडणूक आयोगाने निर्णय देत शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. या निर्णयामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेक वाद निर्माण झाले.
याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ यांनी मोठं वक्तव्य केले होते. त्यांच्या त्या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिला आहे. ठाकरे म्हणाले, मतभेद विसरा म्हणजे काय करा, माझ्याकडे असा कोणताही प्रस्ताव आला नाही आणि तुम्ही (पत्रकारांनी) त्यांच्याकडून अधिक स्पष्ट करा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
तसेच, जे त्यांच्यासोबत गेले नाहीत त्यांची चौकशी सुरू आहे. नगरसेवकांच्या ही चौकशी सुरू आहे. त्या गोष्टी नेमक्या काय आहेत, त्या सुडामध्ये येत नाहीत का? सुड भावनेने पेटून तुम्ही सत्तेचा दूरउपयोग करत आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.
त्याच वेळी, आता सुद्धा मी खेड सभेत सांगितला आहे, कुटुंबाच्या आरोपाची राळ उडवून उध्वस्त करायची, होत नाही म्हणून लाळघोटेपणाने मांडीला मांडी लावून बसायचं, हेच मेघालयात दिसून येत आहे, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उद्देशून एक मोठा वक्तव्य केल होत. ते म्हणाले, संजय राऊत यांना विनंती करतो की, राऊत यांनी आजपासून मनभेत आणि मतभेद बाजूला सारून हाताला हात धरून एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करावे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.
महत्वाच्या बातम्या
देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा उद्धव ठाकरेंकडे मैत्रीचा हात; पहा नेमकं काय म्हणाले…
राजकीय भूकंप! राष्ट्रवादीची भाजपसोबत हातमिळवणी, राज्याच्या सरकारमध्येही सामील होणार