देशात कोरोना महामारी आल्यानंतर शेअर मार्केट गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला होता. पण गेल्या एका वर्षामध्ये शेअर मार्केटने मोठा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. २०२१ या वर्षामध्ये शेअर बाजारात अनेक वेळा चढउतार आले. या चढउतारादरम्यान शेअर बाजाराने आपला उच्चांक गाठला होता.
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी या एका वर्षात भरपूर कमाई केली. गुंतवणूकदारांना झालेल्या कमाईत लार्ज-कॅप विभागाने मोठा वाटा उचलला होता. या आघाडीच्या समभागांनी गुंतवणूकदारांचे पैसे ४ पटींनी वाढवले आहेत. या आघाडीच्या समभागांमध्ये ५ महत्वाचे स्टॉक आहेत, ज्यांनी सर्वाधिक परतावा दिला आहे.
टाटा स्टील या स्टॉकने १ वर्षात २८१% परतावा दिला आहे. या एका वर्षात टाटा शेअरची किंमत ३६० रुपयांवरून १३६५ रुपयांपर्यंत वाढली. या शेअरच्या एका भागामध्ये गुंतवणूकदारांना १००० रुपयांचा फायदा झाला. टाटा स्टील त्या स्टॉकसाठी १३७० रुपये हा उच्चांक १ वर्षात मिळवला. हा शेअर नेहमीच गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतो.
जेएसडब्ल्यू स्टीलने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या स्टॉकने गुंतवणूकदारांना २३५% परतावा दिला आहे. या शेअरची किंमत २१५ रुपयांवरून ७२१ रुपयांपर्यंत वाढली आहे. या शेअरसाठी ७७३ रुपये हा १ वर्षाचा उच्चांक आहे. हा शेअर गेल्या एका वर्षापासून शेअर बाजारामध्ये तेजीत आहे.
कार क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने एका वर्षात १६७% परतावा दिला आहे. एका वर्षात या शेअरची किंमत १०६ रुपयांवरून २८४ रुपयांपर्यंत वाढली. या शेअरसाठी ३६१ रुपये हा १ वर्षाचा हा उच्चांक आहे. २०२० या वर्षात या शेअरची किमंत ढासळली होती. पण मागील वर्षापासून हा शेअर पुन्हा तेजीत आला आहे.
ग्रासिम इंडस या शेअरने देखील गुंतवणूकदारांना खुश केले आहे. या समभागाने १ वारसाहत १५७% परतावा दिला आहे. या दरम्यान शेअरची किंमत ६०० रुपयांवरून १५३२ रुपयांपर्यंत वाढली आहे. अलीकडेच या शेअरने १५९९ रुपयांची पातळी गाठली, जी १ वर्षातील उच्चांकी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयमध्येही गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली आहे. या शेअरने १ वर्षात १२५% परतावा दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत १८९ रुपयांवरून ४२५ रुपयांपर्यंत वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बर्फाच्या वादळातही न डगमगता उभा आहे भारतमातेचा जवान, व्हिडिओ पाहून तुम्हीही ठोकाल सलाम
एम्सची स्थापना नेहरूंनी नाही तर या व्यक्तीने केली होती; त्यासाठी स्वत:ची जमीनही विकली होती
कालीचरणसोबतचा ‘तो’ फोटो व्हायरल केल्याने नेटकऱ्यांवर संतापल्या रुपाली ठोंबरे, म्हणाल्या…